Don 3 First Look: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे 'डॉन' या चित्रपटाची. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. काल फरान अख्तरनं आता यापुढे डॉनच्या चित्रपटांमध्ये शाहरूख खान नसल्याची घोषणा केली होती. यापुढे चित्रपटातून आता शाहरूख खान दिसणार नसून नवा बॉलिवूडचा सुपरस्टार दिसणार असल्याची चर्चा असतानाच काल या चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक फरान अख्तर यानं अधिकृत स्टेटमेंट ट्विटरवरून दिलं आहे त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता सोशल मीडियावरून फरान अख्तरनं डॉन 3 या चित्रपटाचा नवा लुक व्हायरल केला आहे. त्यामुळे आता या चित्रपटाच्या आणि रणवीर सिंगच्या पहिल्या लुकवर चाहत्यांनी कमेंट्स करायला सुरूवात केली आहे. शाहरूख खान सध्या आपल्या 'डंकी' आणि 'जवान' या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा आहे. Don 3 हा 2025 मध्ये येणार असून प्रदर्शित होणार आहे. तेव्हा तुम्ही पाहिलात का रणवीरचा लुक व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल फरान अख्तर यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे त्याची चर्चा रंगलेली होती. यावेळी त्यानं या पोस्टमध्ये लिहिलं होतं की बीग बी आणि शाहरूख खाननंतर एक नवा अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला डॉनच्या रूपात येणार आहे. यापुर्वी बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यानंतर शाहरूख खान यांनी डॉनच्या भुमिका साकारल्या होत्या. त्यामुळे या अभिनेत्यांना आता कोणी बीट करेल. परंतु या दोघांच्याही तोडीस तोड असा कलाकार डॉन बनून आपल्या भेटीला येतो आहे. त्यामुळे सध्या त्याचा हा हटके लुक पाहून चाहतेही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. 


हेही वाचा - TMKOC ची पात्रं योद्धा असते तर? कल्पना भारीये; AI नं केली साकार


डॉन ही सिरिजही बऱ्याच वर्षांनंतर आपल्या प्रेक्षकांसमोर येते आहे. त्यामुळे डॉन सिरिजच्या प्रेक्षकांनाही याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. यावेळी शाहरूख या चित्रपटांतून दिसणार नसल्यानं काहीप्रमाणे प्रेक्षकांची नाराजही आहे. त्यातून अनेकजण हे शाहरूखला या भुमिकेतून मिसही करणार आहेत. 2011 नंतर डॉन 2025 मध्ये पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा आहे. रणवीर सिंगचा हटके लुक पाहून आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती म्हणजे 2025 ला प्रदर्शित होणाऱ्या Don 3 ची. 



रणवीर सिंगचा यावेळी आपल्याला फारच हटके लुक हा पाहायला मिळणार आहे. तेव्हा या चित्रपटाचा फर्स्ट लुक तुम्ही पाहिलात का?