मुंबई : शाळा आणि महाविद्यालयातली मैत्री ही नि:स्वार्थ, निरागस, आणि निखळ असते. कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलेली जीवाभावाची मित्रमंडळी प्रत्येकाच्याच हृदयात एक खास स्थान मिळवून असतात. ह्या सुंदर नात्यावरचा दोस्तीगिरी हा चित्रपट येत्या 24 ऑगस्टला सिनेमागृहात झळकतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संतोष पानकर निर्मित, विजय शिंदे दिग्दर्शित ह्या सिनेमात संकेत पाठक, अक्षय वाघमारे, विजय गिते, पुजा मळेकर, पुजा जयस्वाल हे मुख्य भूमिकेत दिसतील. 'अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स' प्रस्तूत 'मोरया मुव्हिज क्रिएशन्स' निर्मित "दोस्तीगिरी" या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद मनोज वाडकर ह्यांनी लिहीले आहेत.



चित्रपटासंदर्भात सांगताना निर्माते संतोष पानकर म्हणतात, “मनोज वाडकर जेव्हा सिनेमाची कथा घेऊन आले तेव्हा कथा-पटकथा ऐकताक्षणीच ह्या सिनेमाची निर्मिती करायचे मी ठरवले. सिनेमाचे कथानक मैत्रीविषयीचं असल्याने दोस्तीगिरी आंतरराष्ट्रीय मैत्री दिवसाच्या सुमारासच रिलीज करायचा निर्णय आम्ही घेतला.” लेखक मनोज वाडकर सांगतात, “कॉलेज विश्व आणि त्या दिवसांतली बहरणारी मैत्री ह्यावर दोस्तीगिरी हा सिनेमा आहे. ह्या कथेतली पाच मित्र-मैत्रिणींची ‘दोस्तीगिरी’ आपण प्रत्येकजण आपल्या महाविद्यालयीन जीवनात जगलो असल्याची जाणीव हा सिनेमा पाहताना सर्वांनाच होईल असं मला वाटतं. माझ्या महाविद्यालयीन जीवनातले काही प्रसंग मी ह्या सिनेमात वापरले आहेत.” 'अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स' प्रस्तूत,  'मोरया मुव्हिज क्रिएशन्स' निर्मित, "दोस्तीगिरी" चित्रपट 24 ऑगस्ट 2018 ला रिलीज होणार आहे