मुंबई : गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर राज्य करणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. या मालिकेतील प्रत्येक पात्राचं खास आहे. डॉ. हंसराज हाथी हे त्यापैकी एक. मात्र ही भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांचे हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अभिनयाच्या वेडाने झपाटलेले कवी कुमार आझाद जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा त्यांच्या खिशात रुपया नव्हता. घरातील आर्थिक परिस्थितीही ठीक नव्हती. वडीलांना व्यवसायात नुकसान झाले होते. घरातले देखील अभिनय क्षेत्रात जाण्याविरुद्ध होते. त्यामुळे अनेक रात्री त्यांनी मुंबईच्या रस्त्यावर काढल्या आहेत.



दिल्लीतून अभिनयाचे प्रशिक्षण घेऊन मुंबईत आल्यानंतर पावलोपावली त्यांना संघर्ष करावा लागला.



महिला कॉमेडियन टुनटुन यांनी कवी कुमार यांना पाहताच ते अभिनेते होणार अशी भविष्यवाणी केली होती आणि ती अगदी खरी ठरली.



अभिनयासोबत त्यांना कविता करण्याचीही आवड होती. कवी कुमार यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पण जेव्हा त्यांनी तारुण्यात पर्दापण केले तेव्हा त्यांचे शरीर अगदी विचित्र पद्धतीने वाढू लागले आणि बेढब झाले. तरी देखील त्यांनी त्यांच्यातील अभिनयाची आवड मरू दिली नाही.



डॉक्टर हंसराज हाथी ही भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद मुळचे बिहारमधील सासाराम येथील गौरक्षणी येथे राहणारे आहेत.



आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या कवी कुमार आझाद यांच्यावर १० जुलै रोजी मीरारोड येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळेस तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती.