अजय देवगणच्या `दृश्यम 2`चा प्रदर्शनाआधीच धमाका, आतापर्यंत इतक्या रकमेच्या तिकिटांची विक्री
`दृश्यम 2` 18 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. 2015 मध्ये आलेल्या `दृश्यम`चा हा सिक्वल आहे.
मुंबई : अजय देवगणच्या दृश्यम सिनेमाने धुमाकूळ घातला होता. या सिनेमाच्या यशानंतर आता अजय देवगण आणि तब्बू स्टारर 'दृश्यम 2' प्रदर्शनासाठी सज्ज आहे. लवकरच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. अवघ्या काही दिवसातच हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. मात्र त्यााधीच मेकर्सने या सिनेमाबाबत एक गुडन्यूज दिली आहे. होय तुम्ही अगदी बरोबर वाचताय. 'दृश्यम 2'च्या ऑफिशिअल रिलीजआधीच एडवांस बुकिंगच्या नावे बरेच तिकीट्स विकले गेले आहेत. या सिनेमाला रिलीज आधीच खूप चांगला प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळत आहे.
18 नोव्हेंबरला 'दृश्यम 2' रिलीजसाठी सज्ज
'दृश्यम 2' 18 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. 2015 मध्ये आलेल्या 'दृश्यम'चा हा सिक्वल आहे. हा सिक्वल पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्यानंतर चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. प्रेक्षकांची उत्सुकता पाहून निर्मात्यांनीही एडवांस बुकिंग सुरू केलं आहे.
2 ऑक्टोबरला 'दृश्यम 2'चं एडवांस बुकिंग सुरु झालं
दृष्यम 2 साठी एडवांस बुकिंग 2 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलं होतं. त्यानंतर चित्रपटाचं तिकीट कलेक्शन चांगलं होतं. आता एकूण विक्रीनुसार, तीन राष्ट्रीय साखळी PVR, INOX, CINEPOLIS ने सुरुवातीच्या वीकेंडसाठी 35,332 तिकिटं विकली आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाला चार दिवस उरले असताना, 'रनवे 34' आणि 'थँक गॉड'चे रेकॉर्ड एवढ्या मोठ्या एडवांस बुकिंगने सगळे विक्रम मोडले आहेत.
चित्रपटाला UA प्रमाणपत्र मिळालं आहे
या चित्रपटाला नुकतीच सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिली आहे. 'दृश्यम 2' ला UA प्रमाणपत्र देण्यात आलं आहे याचा अर्थ चित्रपटातील एकही सीन कट केलेला नाही. कोणीही ते पाहू शकतो. चित्रपटाची कथा 142 मिनिटांत दाखवली जाणार आहे. म्हणजेच दृष्यम 2 ची वेळ 2 तास 22 मिनिटं आहे. तर, 'दृश्यम' या पहिल्या भागाचा रनटाइम 20 मिनिटांचा होता.
विजय साळगावकर यांचे प्रकरण पुन्हा एकदा उघडणार आहे
दृश्यम 2 मध्ये विजय साळगावकरची केस पुन्हा एकदा उघडणार आहे. पोलिस तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत असलेला अक्षय खन्ना त्याच्या प्रकरणाचा तपास करणार आहे. 2 आणि 3 ऑक्टोबर रोजी घडलेली घटना उघड होईल ज्यात विजय साळगावकर आणि त्यांचं कुटुंब अडकलं आहे.