मुंबई : अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'दृश्यम 2' ( Drishyam 2 ) चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा पहिला भाग 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. सस्पेन्स थ्रिलर पटकथा असलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. 7 वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हे अभिषेक पाठक यांनी केलं आहे. त्यानंतर अजय आणि तब्बू (Tabu) यांच्याविषयी इंटरनेटवर अनेक गोष्टी सर्च करण्यात येत आहेत. त्यात त्या दोघांची नेटवर्थ किती आहे हे देखील सोशल मीडियावर सर्च करण्यात येत आहे. चला तर जाणून घेऊया अजय देवगण आणि तब्बूची एकूण संपत्ती किती चला जाणून घेऊया...


अजय देवगणकडे आहे इतक्या कोटींची संपत्ती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजय चित्रपटांव्यतिरिक्त अनेक ब्रँडच्या जाहिरातींमधून कमाई करतो. एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी 2 कोटी रुपये मानधन म्हणून घेतो. तर एका चित्रपटासाठी अजय 30-50 कोटी रुपये मानधन म्हणून घेतो. फक्त मुख्य भूमिकेसोबतच कॅमिओ भूमिकेसाठीही मोठी रक्कम मानधन म्हणून घेतो. 'गंगूबाई काठियावाडी'मधील छोट्या भूमिकेसाठी अजयनं 11 कोटी रुपये आणि 'आरआरआर'साठी 25 कोटी रुपये आकारले. (Ajay Devgn Net Worth)



तब्बूची एकूण संपत्ती


तब्बूची एकूण संपत्ती 25 कोटी रुपये आहे. तब्बू एका चित्रपटासाठी 2 ते 4 कोटी रुपये मानधन म्हणून घेते. चित्रपटसृष्टीतील महागड्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. ब्रँड एंडोर्समेंटसाठी ती चांगली रक्कम देखील घेत आहे. तब्बुचे मुंबईतील उच्च भ्रु वसतीत घर आहे. हैद्राबाद आणि गोव्यातही तिचे आलिशान घर आहे. तिच्या या घरांची किंमत करोडोंमध्ये असल्याचे म्हटले जाते. मात्र, त्यांची एकूण किंमत किती आहे याविषयी तिनं उघडपणं सांगितलं नाही.  तब्बूकडे मर्सिडीजसह अनेक आलिशान गाड्या आहेत. तिच्या गॅरेजमध्ये Audi Q7, Mercedes, Jaguar X7 यासह अनेक गाड्या आहेत. (Tabu Net Worth)


'दृश्यम 2' चित्रपटात अजयसोबत तब्बू, श्रेया सरन आणि इशिता दत्ता यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेत पाठक यांनी केलं आहे. 'दृश्यम'च्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं. त्याचं 2020 मध्ये निधन झालं. 'दृश्यम 2' या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. (drishyam 2 ajay  devgn and tabu net worth know the number)