Drishyam 2 Box Office Collection Day 6 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकताच अजयचा 'दृश्यम 2' (Drishyam 2) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अजयच्या 'दृश्यम 2' ला चित्रपटला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. खरंतर चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या 6 दिवसांमध्येच चित्रपट सुपरहिट ठरला आहे. दरम्यान, हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला असला तरी देखील बुधवारी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. 


जाणून घ्या चित्रपटानं किती कमाई केली 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजयचा 'दृश्यम 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळेच चित्रपटाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली आहे. एवढंच नाही तर 'दृश्यम 2' लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या कमाईवर नजर टाकल्यास, 'दृश्यम 2'चं पहिल्या दिवशीचं कलेक्शन 15.38 कोटी रुपये होतं. दुसरीकडे, चित्रपटाचं कलेक्शन दुसऱ्या दिवशीही उत्कृष्ट होते आणि त्याने 21.59 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 27.17 कोटींची कमाई केली. दुसरीकडे, चौथ्या दिवशीही चित्रपट चांगले कलेक्शन करण्यात यशस्वी ठरला आणि त्याने 11.87 कोटी रुपयांची कमाई केली. त्याचबरोबर चित्रपटाची पाचव्या दिवसाची कमाईही चांगली झाली आहे. 'दृश्यम 2' ने 5 व्या दिवशी 10.48 कोटी रुपयांची कमाई केली. बुधवारी या चित्रपटाने 10 कोटींचा गल्ला केला आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई आता 96.49 कोटींवर गेली आहे. गुरुवारी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, 'दृश्यम 2' हा 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दृश्यम' च्या पुढील भागाचा चित्रपट आहे. 'दृश्यम 2' चे एकूण बजेट 50 कोटी आहे. त्याचबरोबर या चित्रपटानं कमाईत बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या मर्डर मिस्ट्री थ्रिलरमध्ये अजय पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसत आहे. तब्बू (Tabu), श्रिया सरन (Shriya saran) आणि अक्षय खन्ना (Akshay Khanna) यांनीही या चित्रपटात दमदार अभिनय केला आहे. हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' हे मल्याळम भाषेत त्याच नावानं बनवलेल्या चित्रपटांचे रिमेक आहेत. 


हेही वाचा : Galwan चा उल्लेख करत Richa Chadha नं उडवली भारतीय लष्कराची खिल्ली; भाजप नेत्यानं दिलं सडेतोड उत्तर


'दृश्यम 2' हा 2015 मध्ये आलेल्या 'दृश्यम' चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'दृश्यम 2' ने पहिल्याच दिवशी आपल्या कमाईने हे सिद्ध केले आहे की 7 वर्षांनंतरही विजय साळगावकर आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल लोकांची क्रेझ कमी झालेली नाही. यावेळी अक्षय खन्नाही चित्रपटात या प्रकरणाची चौकशी करताना दिसला आहे. अक्षय खन्नाने नेहमीप्रमाणेच आपल्या अभिनयाने लोकांना प्रभावित केले.