मुंबई : बबिताजी म्हणून मुनमुन दत्ताची प्रतिमा इतकी प्रसिद्ध आहे की आता त्यातून सावरणं कठीण होऊ शकतं. आजही जेव्हा लोक मुनमुन दत्ताला पाहतात तेव्हा नकळत त्यांच्या तोंडून बबिता जी बाहेर पडतं.  मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या प्रत्येक फोटोवर लोक कमेंट करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या सुरुवातीला अनेक समीक्षकांनी अभिनेत्रीच्या अभिनयावर प्रश्न उपस्थित केले होते की तिला अभिनय येत नाही. पण कालांतराने मुनमुन दत्ताने स्वतःला सिद्ध केलं आहे. बबिता म्हणून घरा-घरात पोहचलेली मुनमुन नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. यावेळी अभिनेत्री तिच्या समोर आलेल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे.
 
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री दारूच्या नशेत दिसतेय. तिचा हा धक्कादायक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुनमुनची अशी अवस्था पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या व्हायरल व्हिडिओमध्ये मुनमुन दत्ताने रॉयल ब्लू लाँग वन पीस ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. या लूकला पुर्ण करण्यासाठी तिने आपले केस मोकळे सोडले आहेत आणि हाय हील्स घातल्या आहेत, मात्र लोकांचं लक्ष अभिनेत्रीच्या हावभावावर केंद्रित आहे. मुनमुनच्या या व्हिडिओवर कमेंट करत युजर्सने तिच्या मद्यपानावरही चर्चा केली आहे.


यावर एका यूजरने लिहिलं आहे की, 'नशा हो गया है उसे जिदा.' तर अजून एकाने कमेंट करत लिहीलं की, 'बबिता जीने आज जरा जास्तच ड्रिंक केली आहे.'


 रात्री उशिरा पार्टीतून बाहेर पडल्यानंतर मुनमुन दत्ता थक्क करणारी दिसली. ती स्वत:ला सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करतेय. मात्र नशेमुळे तिची प्रकृतीही बरी दिसत नाहीये. अभिनेत्रीची ही अवस्था पाहून चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.