Dulquer Salmaan Wife : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता दुलकर सलमान त्याच्या वेगवेगळ्या धाटनीच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. दुलकर सलमानला चॉकलेट बॉय या नावानं देखील अनेक लोक ओळखतात. दुलकर सलमाननं फक्त दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाही तर बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. 2012 साली प्रदर्शित झालेल्या 'सेकंड शो' या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली होती. सध्या दुलकर सलमान हा त्याच्या 'किंग ऑफ कोठा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील लव्ह स्टोरीनं सगळ्यांची मने जिंकली तर दुसरीकडे त्याच्या चाहत्यांना त्याची खरी लव्ह स्टोरी जाणून घ्यायची आहे. चला तर जाणून घेऊया दुलकर सलमानची प्यारवाली लव्ह स्टोरी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुलकर सलमानचे चाहते नेहमीच त्याची स्तुती करताना दिसतात. इतकी लोकप्रियता असूनही दुलकरला कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही तो अजूनही जमिनला जोडलेला आहे. दुलकर विषयी जाणून घ्यायचे झाले तर तो कुठेही असेल तरी तो मुलींच लक्ष वेधून घेणारा आहे. त्याचप्रमाणे त्याच्या लग्नाची स्टोरी देखील तितकीच महत्त्वाची आहे. दुलकर सलमाननं 22 डिसेंबर 2011 मध्ये लग्न केलं. त्याची पत्नी ही चेन्नईत आर्किटेक्ट म्हणून काम करत होती. तिचं नाव अमाल सूफिया असं आहे. तर त्या दोघांचे अरेंज मॅरेज होतं. अमाल ही इंटीरिअर डिझायनिंगमध्ये देखील एक्सपर्ट आहे. 



हेही वाचा : ती माझ्या खूप जवळ होती;  प्रियांकाचं नाव न घेता शाहरुख खाननं केलं होतं खळबळजनक वक्तव्य



दुलकरनं एका मुलाखतीत त्याच्या आणि अमालविषयी सांगितलं. अमाल शाळेत असताना पाच वर्षांनी त्याची ज्युनियर होती. त्यानं पुढे सांगितलं की त्याला तिच्यासाठी कधीच काही रोमॅन्टिक भावना नव्हती. पण जेव्हा तेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण करून भारतात आला, तेव्हा त्याच्यावर लग्न करण्यासाठी घरचे दबाव टाकत होते. तर त्याच्या घरच्यांनी आणि मित्र-मैत्रिनींनी अमालला सांगितलं की दुलकर आणि तुझी जोडी चांगली शोभेल. दुलकर जिथे जायचा तिथे कशी ना कशी त्याची आणि अमालची भेट व्हायची. त्यानंतर त्यानं तिच्याशी लग्न करण्याचा विचार केला. जेव्हा त्यांचं कुटुंब भेटलं. तेव्हा त्यांनी लगेच लग्न ठरवलं आणि लग्नाची तयारी सुरु केली. दुलकर आणि अमाल यांना एक मुलगी आहे. तिचं नाव मरियम अमीरा सलमानचे स्वागत केले. अमाल आणि दुलकर हे दोघे त्यांच्या मुलीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.