ती माझ्या खूप जवळ होती;  प्रियांकाचं नाव न घेता शाहरुख खाननं केलं होतं खळबळजनक वक्तव्य

Shah Rukh Khan on Priyanka Chopra : शाहरुख खाननं एका मुलाखतीत त्याच्या आणि प्रियांकाच्या रिलेशनशिपवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अभिनेत्यानं केलेल्या वक्तव्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 26, 2023, 02:54 PM IST
ती माझ्या खूप जवळ होती;  प्रियांकाचं नाव न घेता शाहरुख खाननं केलं होतं खळबळजनक वक्तव्य title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh Khan on Priyanka Chopra : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा नेहमीच त्याच्या चित्रपटांसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहरुख खानचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले. त्यात सगळ्यात गाजलेलं रिलेशनशिपच्या चर्चा म्हणजे त्याच्या आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या. खरंतर शाहरुख आणि प्रियांका हे खूप चांगले मित्र होते. 2011 साली त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्याचा परिणाम शाहरुखच्या वैवाहिक आयुष्यावर झाला होता. 

शाहरुख खानच्या प्रियांका चोप्रासोबत रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्यानंतर गौरीला खूप त्रास झाला होता. खरंतर शाहरुख आणि प्रियांकाच्या रिलेशनशिपच्या चर्चा तेव्हा सुरु झाल्या जेव्हा शाहरुख आणि प्रियांका हे दोघेही चित्रपटाच्या सेटवर काम व्यतिरिक्त एकमेकांसोबत वेळ व्यथित करत असल्याची माहिती समोर आली. या सगळ्याचा गौरी आणि खान कुटुंबावर परिणाम होऊ लागला. यावर एका मुलाखतीत शाहरुखनं प्रियांकाचं नाव न घेता या सगळ्या अफवांवर वक्तव्य केलं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शाहरुख खाननं या मुलाखतीत प्रियांकाचं नाव न घेता सांगितलं की मला मागे वळावं लागलं, कारण मला वाटू लागलं की हे सगळं खूप विचित्र होऊ लागलं होतं. त्यामुळे संबंध बिघडू लागली होते. आमचं तेच नातं होतं जे लोक काम करताना असतं तसंच होतं. ती तर लहाण होती, जी माझ्यासमोर मिस इंडिया झाली. मला नक्की आठवण नाही मिस वर्ल्ड झाली वाटतं. आम्ही पडद्यावर अनेक चांगले क्षण घालवले आहेत. पण नंतर वाटलं की हे नातं खूप विचित्र पद्धतीनं पाहिलं जातं आहे. मला माफी मागायची आहे, मी काही चुकीचं केलं आहे म्हणून नाही तर ती माझी मैत्रीण होती यासाठी. ती माझ्या खूप जवळची मैत्रीण होती. त्यामुळे ती माझ्या हृदयाच्या खूप जवळ होती आणि कायम राहिल.'

हेही वाचा : 500 कोटींच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या 'गदर 2'ला 'ड्रीम गर्ल 2'चा दणका! रिलिजनंतर पहिल्यांदाच...

दरम्यान, असं म्हटलं जातं की या सगळ्या अफवांमुळे प्रियांका चोप्राला चित्रपटसृष्टीत काम मिळत नव्हतं. त्यामुळे प्रियांकानं तिचा रस्ता बदलत बॉलिवूड सोडून हॉलिवूडकडे वळली. तर दुसरीकडे शाहरुख त्याच्या कुटुंबाला पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होता.