Ekta Kapoor Birthday: बॉलिवूडमध्ये अनेकदा कलाकारांना हा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे... तुम्ही लग्न कधी करणार? लग्न हा कोणाचाही वैयक्तिक विषय परंतु कलाकारांच्या लग्नाबद्दल अनेकांचा प्रचंड कुतूहलाचा विषय असतो. सलमान खान अजून लग्न का बरं करत नाही यावर त्याचे चाहते कायमच त्याला प्रश्न विचारताना दिसतात. त्यात या चाहत्यांच्या टार्गटवर असते लोकप्रिय निर्माती आणि दिग्दर्शिका एकता कपूर. एकता कपूरचा आज वाढदिवस आहे. टेलिव्हिजन क्षेत्रात एकेकाळी आपल्या आगळ्यवेगळ्या मालिकांनी चाहत्यांना वेड लावणारी एकता कपूर तिच्या मालिकांमधून कायमच प्रेम आणि नात्यांवर भाष्य करताना दिसली. परंतु स्वत: मात्र आपल्या वैयक्तिक आयुष्यात सिंगल आहे. परंतु यामागे कारण होतं ते म्हणजे तिच्या वडिलांची अट. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेव्हा तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया की ती आजही का आहे अविवाहित? एकता कपूर हिचे वडीलही बॉलिवूडटचे दिग्गज अभिनेते आहे. त्यांच्या चित्रपटांचे आपण आजही फार मोठे फॅन आहोत. त्यामुळे त्यांचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. मागच्यावर्षी एकता कपूरला नामांकित पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या करिअरमध्ये इतकी पुढे गेलेली एकता कपूर ही आपल्या वैयक्तिक आयुष्यात मात्र फार एकटी आहे. तिच्या डेटिंगच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. परंतु अद्यापतरी तिनं लग्न केलेलं नाही. 


हेही वाचा - Trending Blouse साठी फॅशन क्वीन नीना गुप्ताला करा फ्लो अन् दिसा एव्हरग्रीन


एकता कपूर ही 45 वर्षांची झाली आहे. अनेक जण तिच्या लग्नाविषयी वेगवेगळी मतं मांडताना दिसतात. अनेकदा असे समोर येते की ती अद्यापही खऱ्या प्रेमाच्या प्रतीक्षेत आहे तर समोर आलेल्या माहितीनुसार, तिच्या वडिलांच्या एका अटीमुळे ती अद्यापही अविवाहित आहे. परंतु नक्की कारणं काय यावर अनेकदा तर्कवितर्क, चर्चा केल्या जातात. मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान तिनं असा खुलासा केला होती की जेव्हा सलमान खान लग्न करेन तेव्हा मी करेन असं तिनं म्हटेल होते. परंतु या दोघांनीही अद्याप लग्न केलेले नाही. त्यामुळे प्रश्न परत तोच उठतो की यामागे कारण काय? 


एकता कपूरचं नावं हे चंकी पांडे आणि करण जोहरशीही जोडलं गेलं आहे. आपल्या आयुष्यात एकता कपूर सिंगल असली तरी ती सेरोगसीनुसार एका लहान मुलाची आई झाली आहे. 2019 मध्ये तिनं सरोगसीद्वारे एका मुलाला जन्म दिला ज्याचे नावं रवी कपूर आहे. मध्यंतरी एका मुलाखतीत तिनं सांगितले होते की, तिच्या वडिलांनी तिला असं सांगितलं आहे की एकतर तू आई हो नाहीतर काम कर. तेव्हा ती म्हणाली की मी काम करणं निवडलं.