मुंबई : टीव्ही सीरियल आणि चित्रपट निर्माता एकता कपूर (Ekta Kapoor)सध्या चर्चेत आहे. कारण आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला पाहून लोक एकताच्या लग्नाविषयी अंदाज बांधत आहेत. या फोटोत एकतासोबत एक हॅण्डसम मुलगा दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकता कपूर आपल्या खास मित्रासोबत अतिशय कँन्डिड मूडमध्ये दिसतेय, तसाच हा सेल्फी क्लिक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोवर एकता कपूरने लिहिलेलं आहे. ‘और हम यहां हैं... आपको जल्दी ही बताएंगे.’ एकता कपूरने सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केल्यानंतर त्या क्षणापासून चर्चेला उधाण आलं आहे. अनेकांनी एकताला शुभेच्छा दिल्या, तर काहींनी सांगितलं ते वाट पाहत आहेत. एवढंच नाही (Ekta Kapoor) एकता कपूरसोबत दिसणाऱ्या या खास मित्राने देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. यानंतर एकता कपूरच्या लग्नाचे कयास लावले जात आहेत. एकता कपूरला लग्नाआधी सरोगसीच्या माध्यमातून एक मुलगा देखील आहे.


एकतासोबत दिसणारा हा व्यक्ती कोण?



हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला हे जाणून घेण्याची नक्कीच उत्सुकता असेल की हा हँडसम मुलगा कोण आहे, तर या मुलाचं नाव (Tanveer Bookwala)  तन्वीर बूकवाला आहे. हा एकता कपूरचा जवळचा मित्र आहे. एकता कपूरने तन्वीर सोबत फोटो काढला, सोशल मीडियावर शेअर केला आणि त्या खाली लगेच तन्वीरने देखील प्रतिक्रिया दिली आहे. तन्वीरने लिहिलं आहे, ही दोस्ती आता नात्यात बदलण्याची वेळ आली आहे.


एकता कपूर कुटूंबियांशी देखील जवळीक


तन्वीर बूकवालाने (Tanveer Bookwala)आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एकता कपूरसोबत फोटो शेअर केला आहे. यात एका फोटोत शोभा कपूरसोबत त्यांची आई शोभा कपूर, मनीष मल्होत्रा दिसत आहे. यांचा सोबत फोटो पाहून असं दिसतंय की या कुटूंबाचे संबंध खूप जवळचे आहेत.