मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर चाहते अजून त्या दुःखातून सावरलेले नाहीत. अशावेळी आणखी एका बातमी सिने चाहते दुःखी होणार आहेत. हॉलिवूड निर्माता स्टीव्ह बिंग यांनी २७व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५५ वर्षीय स्टीव्ह गेल्या अनेक महिन्यांपासून नैराश्येमध्ये होते. दरम्यान त्यांना करोना विषाणूमुळे आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र या आयसोलेशनमुळे त्यांच्या नैराश्यात आणखी वाढ झाली आहे. परिणामी त्यांनी सोमवारी रात्री लॉस एंजलिसमधील अपार्टमेंटच्या २७ व्या मजल्यावरून उडी घेत आपलं आयुष्य संपवलं आहे.



सोमवारी २ वाजता लॉस एंजिन्सच्या सेंच्युरी सिटीमधील एका लक्झरी अपार्टमेंटमधून २७ व्या मजल्यावरून त्यांनी आत्महत्या केली आहे. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनानंतर हॉलिवूडमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर चाहते श्रद्धांजली अर्पण करत आहेत. 




'द पोलक एक्सप्रेस' आणि 'बियोवुल्फ' सारख्या सिनेमांची निर्मिती त्यांनी केली होती. 'द पोलर एक्सप्रेस'मध्ये ८० मिलियन डॉलरहून अधिक गुंतवणूक केली होती.