Emraan Hashmi : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीचा आज 24 मार्च रोजी 45 वा वाढदिवस आहे. इमरान हाश्मीनं बॉलिवूडमध्ये त्याची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. इमराननं 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फुटपाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. इमराननं त्याच्या करिअरमध्ये अनेक किसिंग सीन दिले. ज्यामुळे त्याला सीरियल किसरचा टॅग मिळाला होता. या सगळ्याचा त्याच्या करिअरवर फार परिणाम झाला होता. फक्त करिअर नाही तर त्याच्या खासगी आयुष्यावर देखील फार परिणाम झाला होता. पण तुम्हाला माहितीये का की इमरान हाश्मी एका विवाहीत महिलेच्या प्रेमात होता? त्याविषयी इमराननं एका मुलाखतीत सांगितलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमरान हाश्मीनं परवीन साहनीसोबत रिलेशनशिपमध्ये नव्हते तेव्हाची ही गोष्ट आहे. 'इंडियाफोरम्स' नं दिलेल्या माहितीनुसार, इमरानला 'टीडब्लूएफ' मध्ये विचारण्यात आलं की "तो अशा चित्रपटांमध्ये दिसतो, ज्यात एक्स्ट्रा-मॅरिटल अफेयर दाखवण्यात येतं. तर त्याचं कधी विवाहीत महिलेसोबत अफेअर होतं?" उत्तर देत इमराननं सांगितलं की "हो, माझं एका विवाहीत महिलेशी अफेयर होतं. मात्र, मला माहित नव्हतं की ती विवाहीत आहे. तर त्या महिलेच्या नवऱ्याला याविषयी कळलं की त्याच्या पत्नीचं इमरान हाश्मीसोबत अफेयर आहे. एक दिवस त्यानं त्या दोघांना पकडलं. तिथून पळून जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता. या सगळ्याचा शेवट फार वाईट होता. आम्ही दोघं एक फ्रीज झालो होतो." 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटासाठी अंकिता लोखंडेनं किती मानधन घेतलं?


इमरान हाश्मी त्यानंतर परवीन साहनीसोबत रिलेशनशिपमध्ये आला. ते बरीच वर्षे म्हणजेच जवळपास साढे सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी 2006 मध्ये लग्न केलं आणि एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांची जोडी फार भारी असली तर परवीनला इमरानच्या ऑनस्क्रिन किसिंगमुळे फार वाद झाले. तिला ते आवडायचं नाही. इमराननं एकदा 'कॉफी विद करण' मध्ये सांगितलं की त्याच्या एका चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान, पत्नी परवीननं त्याच्या हातावर नखानं इतकं ओरबाडलं की त्याच्या हातातून रक्त येऊ लागलं. त्याचं कारण चित्रपटातील त्याचं किसिंग आणि रोमॅन्टिक सीन्स आहेत. परवीनला या गोष्टीचा राग आला होता की मोठ्या पडद्यावर असे सीन्स देण्याआधी त्यानं तिला काही सांगितलं का नाही.