Raj Kundra Pornography Case Update: 2021 मध्ये निर्माता राज कुंद्रा यांच्यावर अश्लील चित्रपट आणि प्रोर्नोग्राफी बनवण्यावरून अनेक आरोप करण्यात आले होते. त्याला प्रकरणी अटकही झाली होती. बरेच दिवस तो तुरूंगातही होता. राज कुंद्राची पोर्नोग्राफी केस प्रचंड गाजली होती. त्यावरून शिल्पा शेट्टी आणि त्यांच्या नात्यातही कटूता निर्माण झाल्याची चर्चा होती. परंतु आता राज कुंद्रा प्रकरणात मोठी बातमी समोर येत असून यावेळी त्याला ईडीकडून क्लिट चिट मिळण्याचे स्पष्ट होते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2022 च्या मे महिन्यात त्याला मुंबई पोलिसांकडून अश्लील पोर्नोग्राफी प्रकरणी अटकही करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यावर मनी लॉंड्रिगचेही आरोप लावण्यात आले होते ज्याची चौकशी आणि कारवाई अद्यापही सुरू होती. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, ईडीला पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचा कुठलाच थेट संबंध आढळून न आल्याचे समोर आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सध्या ईडी राज कुंद्राच्या मनी लॉंड्रिग प्रकरणावर जोर देते आहे. इंग्लंड स्थित कंपनी Kenrin, जी मनी लॉंड्रिंगमध्ये अडकलेल्या इतर शेल कंपन्यांशी जोडलेली आहे. यात असेही आढळून आले आहे की, राज कुंद्राचा मेहुणा, प्रदीप बक्षी, केनरिन या कंपनीचा मालक आहे. सोबतच हॉटशॉट अॅपचे अधिकृत प्रवर्तकही आहेत. 


ईडीच्या सुंत्रांनुसार, आर्म्स प्राईम मीडिया लिमिटेडेचे सीईओ सौरभ कुशवाह यांनी जानेवारी 2019 मध्ये या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी राज कुंद्रा यांच्या संपर्क साधला होता. त्याचवर्षी डिसेबंरपर्यंत त्यांचा संबंध कायम होता. हॉटशॉट हे अॅप निर्माण केल्यानंतर ते केनरिनला 25,000 डॉलरमध्ये विकण्यात आले. ED त्यांच्या बॅंकच्या व्यवहारांची तपासणी करते आहे. 


हेही वाचा : कुणाला घर सोडावं लागलं, कुणी घरातच अडकलं; Michong चक्रीवादळाचा सुपरस्टार्सना फटका


राज कुंद्रा याला 19 जूलै 2021 मध्ये भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा केल्यानंतर अटक करण्यात होती. मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट एसबी भाजीपाले यांनी जामीन अर्जावर 50 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर परवानगी दिली. सरकारी वकीलांनी त्यांच्या अर्जाला विरोधही केला होता. पोलिसांनी आरोपपत्रात राज कुंद्राला मुख्य सुत्रधार असल्याचा दावा केला होता. तरूणींचे अश्लील चित्रीकरण करून ते विकणे आणि यातून त्यांचे लैंगिक शोषण करणे हा त्याच्यावरील प्रामुख्यानं केला गेलेला आरोप होता. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


राज कुंद्रा जामीन मिळण्यापासून काळ्या हेलमेटमध्ये दिसतो आहे. त्यामुळे त्याला अनेक जणं ट्रोलही करतात. आता तोंड लपवण्याची वेळ आली आहे असं अनेकांनी म्हटलं. काही दिवसांपुर्वी त्याच्या या केसवर आधारित UT 69 या चित्रपटाचीही बरीच चर्चा होती.