पठाणशी जोडले गेलेत बॉलीवूडमधले तीन खान, सलमाननंतर आमिर खानचंही चित्रपटाशी खास कनेक्शन
पठाण चित्रपटाशी बॉलिवूडमधील तीनही खानचं कनेक्शन आहे. मुख्य भूमिकेत शाहरुख खान तर पाहुणा कलाकार म्हणून सलमान खानने भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे आमिर खानचंही या चित्रपटाशी खास कनेक्शन आहे.
Pathaan : नव्या वर्षात शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) चित्रपटाने बॉलिवूडला (Bollywood) आशेचा नवा किरण दाखवला आहे. 2022 मध्ये काही मोजके चित्रपट वगळता बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर (Box Office) अक्षरश: आदळले. पण बॉलिवूडवरचं हे ग्रहण पठाणच्या निमित्ताने अखेर सुटलंय. शाहरुख खानच्या पठाणने पहिल्याच दिवशी जगभरात 100 कोटी रुपयांची कमाई केली आणि सर्व रेकॉर्ड मोडले. चित्रपटापूर्वी झालेल्या वादाचा फारसा परिणाम 'पठाण'वर जाणवला नाही.
शाहरुखबरोबर सलमान खानही चित्रपटात
या चित्रपटात सलमान खाननेही (Salman Khan) छोटी भूमिका साकारली आहे. पठाणचा जीव वाचवण्यासाठी टायगर त्याच्या मदतीला धावून येतो असा एक सीन सलमानने या चित्रपटात साकारला आहे. टायगरची एन्ट्री पाहून चाहत्यांना करण-अर्जुनची आठवण आली. गुंडांना धूळ चारल्यानंतर सलमान शाहरुखकडे जातो आणि त्याला कॉफीचा ग्लास देतो अशी छोटीसी भूमिका सलमानची आहे.
आमिर खानच्या बहिणीने साकारली भूमिका
सलमान खाननंतर आणखी एका खानचं या चित्रपटाशी कनेक्शन आहे. आमिर खानच्या बहिणीने या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. आमिर खानची बहिण निकहत हेगडे (Nikhat Hegde) हिचं या चित्रपटातील मुख्य पात्र आहे. निकहत या चित्रपटात एक अफगाण महिलेची भूमिका साकारत असून हिचीच कहाणी पठाण दिपिकाला ऐकवताना दाखवण्यात आलं आहे. अफगाणी सूट आणि डोक्यावर शॉल ओढलेल्या निकहतच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होतंय.
दुसऱ्या दिवशीही रेकॉर्ड कायम
शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने पहिल्या दिवशी 54 कोटींचा आकडा पार केला आहे. दुसऱ्या दिवशी 26 जानेवारीला सुट्टीचा दिवस असल्याने चित्रपट 60 कोटींचा आकडा गाठेल असा दावा चित्रपट समीक्षकांनी केला आहे. म्हणजेच दोन दिवसातच भारतात हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये पोहोचेल असा अंदाजही वर्तवला जातोय. या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीला नवी उर्जा मिळाली आहे. 2022 मध्ये हिंदी चित्रपटांना जे ग्रहण लागलं होतं, ते वर्षाच्या सुरुवातीलाच सुटलं आहे.

याआधीही साकारली चित्रपटात भूमिका
निकहत हेगडे यांनी याआधी सांड की आंक या सिनेमात अभिनय केला आहे. त्यानंतर तीने छोट्या पडद्यावर पदार्पम केलं. बन्नी चाऊ डोम डिलिव्हरी या मालिकेतून तीने टीव्हीवर पदार्पण केलं. ताहिर खान आणि जीनत हुसैन यांना चार मुलं आहेत. आमिर खान, फैजल खान, फरहत खान आणि निकहत खान अशी त्यांची नावं आहे. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम किसी से कम नहीं' या चित्रपटात त्याने कॉस्च्युम असिस्टंट म्हणून काम केलं होतं.