बॉलिवूडचं आणखी एक कपल अडकणार लग्नबंधनात, `ही `मराठी अभिनेत्री होणार कतरीनाची जाऊबाई?
विकी कौशलनंतर आता त्याचा लहान भाऊ अभिनेता सनी कौशलचं होणार शुभमंगल सावधान, `ही` मराठी अभिनेत्री होणार कौशल कुटुंबाची सून?
Entertainment News : बॉलिवूडच्या (Bollywood) हिट कपलमधलं एक सुपरहिट कपल (Super Hit Couple) म्हणजे अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal). या दोघांच्या लग्नाला आता वर्ष होत आलं आहे. पण यानंतरही या कपलबद्दल अनेक बातम्या समोर येत असतात. आता कपलशी संबंधीत आणखी एक गोष्ट समोर आली आहे. विकी कौशलनंतर आता त्याचा लहान भाऊ सनी कौशल (Sunny Kaushal) लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. सनी कौशलनेही बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवलं आहे.
हॉटस्टारवर नुकताच प्रदर्शित झालेल्या 'शिद्दत' (Shiddat) या चित्रपटात सनी कौशलने काम केलं आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका चाहत्यांच्या चांगलीच पसंती मिळाली. अभिनेत्री जानव्ही कपूरसोबतच्या (Janhvi Kapoor) सनी कौशलच्या बहुचर्चित 'मिली' (Milli) चित्रपटाचीही चांगली चर्चा रंगली आहे. याआधी सुपरस्टार अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'गोल्ड' (Gold) सिनेमातल्या त्याच्या भूमिकेने त्याला नवी ओळख मिळवून दिली होती. 'द फॉरगॉटन आर्मी' (The Forgotten Army) या सीरिजमध्ये सनीने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
सनीचं या अभिनेत्रीबरोबर जोडलं जातंय नाव
सनी कौशल आपल्या प्रोफेशल लाईफबरोबरच वैयक्तिक लाईफमुळेही नेहमीच चर्चेत असतो. सनी कौशलचं नाव सध्या एका मराठी अभिनेत्रीशी जोडलं जात आहे. सनी शर्वरी वाघला (Sharvari Wagh) डेट करत करत असल्याची चर्चा असून लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडणार असल्याचंही बोललं जात आहे. 'द फॉरगॉटन आर्मी' या वेबसीरिजमध्ये (Web Series) सनी आणि शर्वरीने एकत्र काम केलं, यादरम्यानच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं सांगितलं जातंय. विकी आणि कतरिनाच्या लग्नात शर्वरीची उपस्थिती सर्वांच लक्ष वेधून घेत होती. या लग्नात तिचा वावर बघून सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या होत्या. कुटुंबातील एखाद्या सदस्याप्रमाणेच ती या लग्नसोहळ्यात मिरवत होती.
इतकंच काय तर शिद्दत चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगलाही शर्वरी हजर होती. यावेळी सनी कौशल आणि शर्वरी वाघ यांनी एकत्रीत फोटोशूट ही केलं. त्यामुळे पुन्हा एकदा दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. पण दोघांना या बाबत कोणतच अधिकृत विधान केलेलं नाही. पण नुकतंच एका मुलाखतीत शर्वरीने यावर आपलं मौन सोडलं. मी आणि सनीने 'द फॉरगॉटन आर्मी' या सीरिजमध्ये एकत्र काम केलं होतं, पण त्या गोष्टीला आता चार वर्ष झाली आहेत. त्यावेळी आमची मैत्री झाली होती, आणि ती आजही तशीच आहे. या व्यतिरिक्त आमच्यात काहीच नाही असं शर्वरी वाघने स्पष्ट केलं आहे.
आमच्या अफेरच्या किंवा लग्नाच्या चर्चा होत असल्या तरी त्याचा आमच्या मैत्रीवर काहीही परिणाम होणार नसल्याचंही शर्वरीने स्पष्ट केलं आहे. शर्वरी वाघ ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची नात आहे. शर्वरीची आई नम्रता ही मनोहर जोशी यांची मुलगी असून तिचे वडील शैलेश वाघ हे प्रसिद्ध बिल्डर आहेत. शर्वरीने नुकतंच 'बंटी और बबली 2' मधून बॉलिवूडमध्ये दमदार डेब्यू केला आहे. तसंच छोट्या पडद्यावर अनेक जाहीरातीतही शर्वरी दिसत असते.