Tanusha Sharma Death : छोट्या पडद्यावरील तुनिषा शर्माने 24 डिसेंबरला आत्महत्या केली. तुनिषाच्या मृत्यूच्या 3 दिवसानंतरचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे. सेटवर मेकअप रुममध्ये तुनिषाने गळफास घेत आपलं जीवन संपवलं.  मेक अप रुमचा दरवाजा तोडून तुनिषाला बाहेर काढलं, त्यानंतर शीजान आणि सेटवरच्या दोघांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेलं. त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे त्या व्हिडिओत?
रुग्णालयच्या बाहेरील हा व्हिडिओ आहे. ज्यात शीजान खान आणि अन्य दोघं जणं तुनिशाला उचलून रुग्णालयात नेताना दिसत आहेत. रुग्णालयाबाहेरचं हे सीसीटीव्ही फुटेज असून यात एक व्यक्ती रुग्णालयात धावत जाताना दिसत आहे, यात एक सफेद रंगाची कारही दिसत आहे. कारमधून शीजान आणि इतर दोघंजणं तुनिशाला घेऊन बाहेर पडतात, आणि सर्व जण रुग्णालयाच्या दिशेने धावत जाताना दिसतायत. एकाने तुनिषाला उचलून घेतल्याचं दिसत आहे. सर्वजण खुपच तणावात दिसत आहेत. लवकरात लवकर तुनिषाला उपचार मिळावेत यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत. 


या व्हिडिओत तुनिषा आणि शीजान हो दोघंही अलीबाबा मालिकेच्या कपड्यांवर दिसत आहेत. यावरुन मालिकेची शुटिंग सुरु असल्याचं स्पष्ट होतंय. त्यांचं पॅकअप झालं नव्हतं, शुटिंगदरम्यान मेकअप रुममध्ये तुनिषाने आत्महत्या केली.


सेटवर नेमकं काय घडलं?
24 डिसेंबरच्या दिवशी सेटवर इतर दिवसांसारखीच शुटिंग सुरु होती.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शीजान आणि तुनिषाने एकत्र लंच केला. त्यानंतर शीजान शुटिंगसाठी सेटवर गेला. या लंचदरम्यानच शीजान आणि तुनिषामध्ये काहीतरी बिनसल्याचा पोलिसांना संशय आहे. यामुळेच तुनिषाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. लंचनंतर तुनिषाने शीजानच्या मेकअप रुममध्ये जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. 


काही वेळाने शीजान मेकअप रुममध्ये जाण्यासाठी आला. तेव्हा रुमचा दरवाजा आतून बंद होता. शीजानाने तनुषाच्या नावाने आवाज दिला. पण आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे अखेर शीजानने दरवाजा तोडला. पण आतलं दृष्य ऐकून शीजानला धक्का बसला. तुनिषाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. शीजानने तात्काळ सेटवरच्या इतर लोकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर तुनिषाला रुग्णालयात नेण्यात आलं.



शीजान खानवर आरोप
तुनिषा आत्महत्याप्रकरणी शीजान खानवर आरोप करण्यात आले आहेत. तुनिषाच्या आईने शीजान खानविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे शीजान खानला अटक करण्या आली. शीजानवर तनुषाला धोका दिल्याचा तसंच आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. 


अंत्यसंस्कार विधित तनुषाच्या आईला आली चक्कर
दरम्यान, तुनीषा शर्मा हिच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार झाले. मीरारोड इथल्या तिच्या राहत्या घरा जवळ असलेल्या गोड देव नाका इथल्या स्मशानभूमीत आज 4:30 वा सुमारास अंत्यविधी झाले. यावेळी तनुषाची आई वनिता शर्मा यांची मानसिक स्थिती स्थिर नसल्याने तिला चक्कर आली. आजूबाजूला असलेल्या तिच्या नातेवाईकांनी तिला सवरले. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.