`रमैया वस्तावैया`, `पोन्नियिन सेल्वन` शब्दांचा अर्थ काय? जाणून वाटेल आश्चर्य
हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक गाणी किंवा चित्रपटांची नांव आहेत, ज्याचा अर्थ आपल्याला माहित नसतो पण ती ऐकायला आणि उच्चारायला छान वाटतात. आज आम्ही तुम्हाला अशाच दोन हिंदी शब्दांचा अर्थ सांगणार आहोत
Entertainment : बॉलिवूडमध्ये (Bollywood) दरवर्षी शेकडो चित्रपट प्रदर्शित होत असतात. यापैकी मोजकेच चित्रपट (Movie) लोकांच्या लक्षात राहातात. यातले काही चित्रपट त्यातल्या अभिनयामुळे, कधी गाण्यांमुळे तर कधी दमदार कथेमुळे हे चित्रपट लक्षात राहात. पण असेही काही चित्रपट असतात जे त्याच्या नावामुळेही (Movie Unique Name) कायमचे मनावर कोरले जातात. काही वेळा चित्रपटातल्या गाण्यातील विचित्र शब्दांमुळेही ती गाणी किंवा चित्रपट लक्षात राहातात.
चित्रपटात किंवा गाण्यात असे काही शब्द असतात जे ऐकायला आणि उच्चारायलाही मजेदार वाटतात. पण त्या शब्दांचा अर्थच आपल्याला माहित असतो. आज आम्ही तुम्हमला अशाच दोन शब्दांचा अर्थ सांगणार आहे. यातला पहिला शब्द आहे 'रमैया वस्तावैया' (Ramaiya Vastavaiya) आणि दुसरा शब्द आहे 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan)
'रमैया वस्तावैया' चा अर्थ काय
ज्येष्ठ अभिनेते राजकपूर आणि अभिनेत्री नर्गिस यांचा 'श्री 420' हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटातील 'रमैया वस्तावैया' हे गाणंही तितकंच हिट ठरलं. हे गाणं आपण हजारवेळा ऐकलं असेल. इतकंच काय तर आजही हे गाणं तितकंच लोकांच्या तोडीं आहे. याच नावाचा 2013 मध्ये एक हिंदी चित्रपटही आला. यात गिरीश कुमार, सोनू सूद आणि श्रुती हसन यांची प्रमुख भूमिका होती.
अनेक प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला असेल किंवा लाखो लोकांनी राजकुमार-नर्गिसचं 'रमैया वस्तावैया' हे गाणं गायलं असेल. पण कधी विचार केला आहे का, की या शब्दाचा नेमका अर्थ तरी काय आहे. 'रमैया वस्तावैया' हा एक तेलुगू शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ आहे रामा तून कधी येणार?
'पोन्नियिन सेल्वन' चा अर्थ काय
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि चियान विक्रम यांची प्रमुख भूमिका असलेला 'पोन्नियिन सेल्वन' या बिग बजेट चित्रपटाचा दुसरा भाग गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. चित्रपटाचा पहिल्या भागाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभला होता. पण दुसरा भाग बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करु शकला नाही. या चित्रपटात ऐश्वर्या आणि चियान विक्रम यांच्यासह जयम रवी, कार्ति सिवाकुमार, तृषा कृष्णन आणि सोभिता धूलिपाला यांनीही काम केलं आहे. हा चित्रपट त्याच्या कथेपेक्षा त्याच्या नावामुळे लोकांच्या लक्षात राहिलाय. 'पोन्नियिन सेल्वन' या शब्दाचा अर्थ आहे कावेरी नदीचा मुलगा.. पोन्नि म्हणजे कावेरी.