अभिनेत्रीच्या पतीवर आली चेहरा लपवून फिरण्याची वेळ? वाचा काय आहे या मागचं कारण
अश्लील चित्रपट बनवण्याचा आरोप झाल्याने आला होता चर्चेत, आता पब्लिक प्लेसमध्ये फिरतो चेहरा लपवून
Entertainment News : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सध्या राज कुंद्रा जामिनावर बाहेर आहे. राज कुंद्रा याला झालेल्या अटकेचा शिल्पा शेट्टीला खूप त्रास सहन करावा लागला. पण त्यातून बाहेर येत तिनं टी.व्ही शोज आणि सिनेमातनं पुन्हा काम करायला सुरुवात केली. पण आता पुन्हा एकदा राज कुंद्रा चर्चेत आहे. याचं कारण आहे त्याचा विचित्र ड्रेस. (Shilpa Shetty husband Raj Kundra cover his face by mask)
पब्लिक प्लेसमध्ये राज कुंद्रा संपूर्ण चेहरा झाकला जाईल असे कपडे घालतो. अनेकवेळा त्याला अशा कपड्यांमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. यावरुन त्याला लोकांनी अनेकवेळा ट्रोलही केलं आहे. याबरोबरच लोकांना उत्सुकता आहे ती तो असे कपडे का घालतो. या प्रश्नाचं उत्तर राज कुंद्राने याआधी कधीच दिलं नव्हतं. पण आता त्याने याबाबत आपलं मौन सोडलं आहे.
आता ट्विटरवरच्या इंटरअॅक्टिल सेशनमध्ये बोलताना राज कुंद्राने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. लोकांनी त्याच्या आणि शिल्पा शेट्टीच्या लग्नाबद्दल तसंच त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबतही प्रश्न विचारले. तर काही लोकांनी पब्लिक प्लेसमध्ये तू चेहरा का झाकतोस यावरही प्रश्न विचारला.
काही दिवसांपूर्वीच राज कुंद्रा मुंबई विमानतळावर चित्रविचित्र पोशाखात दिसला. यावेळी त्यानं एकदम विचित्र असं जॅकेट घातलं होतं. त्यामुळे त्याच्या या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. त्यानं निळ्या रंगाचं जॅकेट घातलं होतं. राज कुंद्राला या लूकमध्ये कुणालाच ओळखता आलं नाही.
यावर प्रश्नांना राज कुंद्राने दिलखुलास उत्तर दिलं. पब्लिक प्लेससाठी नाही तर मीडिच्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी आपण चेहरा झाकत असल्याचं राज कुंद्रा याने म्हटलं आहे.