`सचिन : अ बिलियन ड्रीम्स` राज्यात टॅक्स फ्री
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित `सचिन अ बिलियन ड्रीम्स` हा सिनेमा आज सर्वांच्या भेटीला आलाय.
मुंबई : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' हा सिनेमा आज सर्वांच्या भेटीला आलाय.
राज्यातही आता हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आलाय. ओडिशा, केरळ आणि छत्तीसगड या राज्यांनंतर आता राज्यातही सिनेमा टॅक्स फ्री झालाय.
ब्रिटीश फिल्ममेकर जेम्स अर्स्किन यांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केलेय. हा सिनेमा मराठी, हिंदीसोबत इतर भाषांमध्ये हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय.