मुंबई : बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमामालिनी आणि धर्मेंद्र पुन्हा आजी-आजोबा झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्याकडे आज चिमुकल्या परीचं आगमन झाले आहे. ईशा देओलने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयामध्ये आज सकाळी (23 ऑक्टोबर) एका मुलीला जन्म दिला आहे. 


हेमामालिनी आणि धर्मेंद दुसर्‍यांदा आजी-आजोबा झाले आहेत. हेमा मालिनींची मुलगी अहाना आणि वैभव वोहरा यांना 'डॅनिएल' नावाचा मुलगा आहे. आता त्याच्या जोडीला ईशाची मुलगी आल्याने दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


ईशा देओलने एप्रिल महिन्यामध्ये ती आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. त्यानंतर गरोदरपणाच्या काळातील अनेक गोड क्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला आले होते. ईशाचा 'गोदभराई'चा सोहळादेखील खास होता. या वेळेस ईशा आणि भरत यांनी त्यांच्या लग्नसोहळ्याचा आनंद घेतला होता. ईशा आणि भरत अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर २९ जून २०१२ साली दोघे विवाहबंधनामध्ये अडकले होते. 


ईशा देओल ही उत्तम शास्त्रीय नृत्यांगणा आणि अभिनेत्री आहे. काही मोजक्याच  चित्रपटांतून ईशा रसिकांच्या भेटीला आली होती.२०१५ साली ‘किल देम यंग’हा ईशाचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर ईशा बरेच दिवस रूपेरी पडद्यापासून दूर होती.