धर्मेंद्र-हेमा मालिनीच्या मुलीचा घटस्फोट, अखेर ईशा देओलनं केलं कन्फर्म!
गेल्या अनेक दिवसांपासून धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
मुंबई : अभिनेत्री ईशा देओल आणि भरतने गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. या दोघांनी खूप मोठा निर्णय घेतला आहे ज्याने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ईशाने 29 जून 2012 रोजी भरत तख्तानीशी लग्न केलं. या दोघांनी मुंबईच्या इस्कॉन मंदिरात अत्यंत साधेपणाने लग्नगाठ बांधली होती. 2017 मध्ये त्यांनी राध्या या त्यांच्या पहिल्या मुलीला जन्म दिला यानंतर ईशा 2019 मध्ये पुन्हा आई झाली. तिच्या दुसऱ्या मुलीचं नाव मिराया असं आहे. ईशा आणि भरत हे दोन मुलांचे पालक आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून ईशा देओल आणि भरतच्या दुराव्याच्या चर्चा होत्या. दोघे वेगळे होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता समोर आलेल्या बातमीनुसार लग्नाच्या जवळपास 11 वर्षानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली टाइम्सला जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ईशा देओल आणि भरत यांनी विभक्त झाल्याची माहिती दिली आहे. या निवेदनात असं म्हटलं गेलं आहे की, 'आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या जीवनातील हा बदल आपल्या आणि आपल्या मुलांच्या दोघांच्या हिताचा आहे आणि तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आमच्या गोपनीयतेचा आदर केला जाईल याची आम्हाला प्रशंसा होईल.
गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांमध्ये काही ठिक चालत नसल्याचं बोललं जात होतं. गेल्या वर्षी जूनमध्ये ईशाने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते आणि तिचं प्रेमही व्यक्त केलं होतं. यानंतर भरत बऱ्याचदा फॅमिली फंक्शनमध्ये दिसला नव्हता यावेळी या बातम्यानी अजून जोर धरला होता. ईशाचा वाढदिवस असो किंवा मग हेमा मालिनी यांचा वाढदिवस असो येत्या काळात तो देओल फॅमिलीसोबत कुठेच दिसत नव्हता. तेव्हापासून त्यांच्या नात्यातील मतभेदाच्या अफवा सुरू झाल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या बातम्या येत होत्या. ईशाने एक सिक्रेट पोस्टही लिहिली होती. इंस्टाग्रामवर ईशाने एक गाण्याचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती आफताब शिवदासानीसोबत डान्स करत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत ईशाने कॅप्शनमध्ये लिहलं की, 'कधीकधी तुम्ही गोष्टी सैल सोडल्या पाहिजेत आणि फक्त तुमच्या हृदयाच्या ठोक्यावर नाचलं पाहिजे.'