मुंबई : बॉलिवूडचा दिग्गज स्टार धर्मेंद्र (Dharmendra) यांची दोन लग्न झाली आहेत. धरम पाजी यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झालं होतं. हा विवाह कुटुंबीयांच्या इच्छेनं झाला असून लग्नाच्या वेळी धर्मेंद्र हे अवघं 19 ​​वर्षे होते. प्रकाश कौर (Prakash Kaur) आणि धर्मेंद्र यांना सनी, बॉबी, विजेता आणि अजिता ही चार मुलं झाली. त्याचवेळी धरम पाजी यांनी 1980 मध्ये हेमा मालिनीसोबत (Hema Malini) दुसरं लग्न केलं आणि या लग्नातून धर्मेंद्र यांच्या घरी दोन मुली ईशा आणि आहाना जन्मल्या.


आणखी वाचा : हृतिक आणि सैफच्या यशात 'या' गोष्टीचा मोलाचा वाटा..., दोघांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्मेंद्रच्या दोन्ही पत्नी मुलांसह वेगळ्या घरात राहतात. हेमा मालिनी त्यांच्या चरित्र 'हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल'मध्ये हेमा आणि त्यांच्या कुटुंबातील कोणालाही धर्मेंद्रच्या घरी जाण्याची परवानगी नव्हती असा उल्लेख आहे. दरम्यान, ही परंपरा मोडीत काढणारी घटना घडली.


आणखी वाचा : नोरा फतेही गार्डन डान्स करताना आली हवा अन्..., पाहा काय झालं


खरंतर 2015 साली धर्मेंद्र यांचे भाऊ अजीत यांची तब्येत बिघडली होती, ते ईशा आणि आहानावर खूप प्रेम करत होते आणि या काळात त्यांना ईशाला भेटायचं होतं. अशा परिस्थितीत ईशानं तिचा सावत्र भाऊ सनी देओलला फोन करून अजित देओलला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. असं म्हटलं जातं की, सनी स्वतः ईशासोबत त्यांच्या घरी गेला आणि तिथे तिला अजित देओलला भेटायला मिळालं.


आणखी वाचा : Private Photo लीक ते साखरपूडा तुटण्यापर्यंत, ही अभिनेत्री आहे तरी कोण


यादरम्यान ईशाही पहिल्यांदा प्रकाश कौर यांना भेटली होती आणि प्रकाश कौर यांनीही तिला आशीर्वाद दिल्याचे सांगण्यात येत आहे. हेमा यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितलं होतं की, धर्मेंद्रसोबत लग्न करण्यासोबतच त्यांनी हेही सांगितलं होतं की, धर्मेंद्र कधीही त्याच्या कुटुंबापासून दूर व्हायला नको.