Private Photo लीक ते साखरपूडा तुटण्यापर्यंत, ही अभिनेत्री आहे तरी कोण

जाणून घ्या, या अभिनेत्रीच्या आयुष्यातील अनेक गोष्टी

Updated: Sep 30, 2022, 06:10 PM IST
Private Photo लीक ते साखरपूडा तुटण्यापर्यंत, ही अभिनेत्री आहे तरी कोण title=

मुंबई : Ponniyin Selvan 1 हा बहुप्रतिक्षित चित्रपट आज 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक या चित्रपटाचं प्रचंड कौतुक करत आहेत. या मल्टीस्टारर चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटात एकापेक्षा एक दिग्गज सुपरस्टार आहेत. यापैकी एक म्हणजे त्रिशा कृष्णन. (Trisha Krishnan) चित्रपटात अतिशय सुंदर दिसणारी त्रिशा प्रोफेशनलसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी त्रिशाचे काही इंटिमेट फोटोज सोशल मीडियावर लीक झाले होते, ज्यामुळे बराच गदारोळ झाला होता. हा फोटो दाक्षिणात्य स्टार राणा डग्गुबतीला किस करतानाचा होता. 

आणखी वाचा : शर्टाचं बटन उघडं सोडून अभिनेत्री पोहोचली एअरपोर्टवर, पाहाताच उडाली खळबळ

त्रिशा कृष्णनची गणना दक्षिण चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिनं अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं. तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच ती स्वतःशी संबंधित वादांमुळेही चर्चेत असते. त्रिशा कृष्णनच्या अफेअर्सचे किस्से काही कमी नाहीत. राणा दग्गुबतीसोबत थलपथी विजयसोबतही तिचं नाव जोडण्यातं आले होते. विजयसोबत तिची पहिली भेट 'गिली' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनासोबतच त्यांच्या अफेअरच्या बातम्यांनीही बरीच चर्चा सुरु होती. मात्र, दोघांनीही हे नातं मान्य केलं नाही.

आणखी वाचा : दीपिका आणि रणवीर वेगळे होणार? अभिनेता म्हणाला...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : 'Mahesh Manjrekar नोकरीवर...', सलमान खाननंतर अभिजीत बिचुकलेचा महेश मांजरेकरांवर निशाणा

यानंतर त्रिशा कृष्णनचं नाव राणा दग्गुबतीसोबत जोडण्यात आलं. दोघांच्या रिलेशनशिपची सर्वत्र चर्चा होऊ लागली. दोघांचं नाते बरेच दिवस टिकलं आणि नंतर ब्रेकअप झालं. त्रिशा कृष्णन आणि राणा दग्गुबती यांच्यातील नात्याला अधिक गती मिळाली जेव्हा दोघांचे किस करतानाचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले. या फोटोंमुळे साऊथ इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा : Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: या महिन्यात होणार दयाबेनचं पुनरागमन

39 वर्षीय त्रिशा कृष्णन अजूनही अविवहीत आहे. रिपोर्ट्सवरनुसार, जानेवारी 2015 मध्ये तिची बिझनेसमन वरुण मनियानशी एंगेजमेंट झाली होती. पण एंगेजमेंटच्या 5 महिन्यांनंतर अचानक ब्रेकअपची बातमी समोर आली. ही एंगेजमेंट तुटण्याचं कारण अभिनेता धनुष असल्याचं म्हटले जाते. वरुणला त्रिशा-धनुषची मैत्री आवडली नाही आणि अखेर हे नातं तुटलं.

आणखी वाचा : ज्या भाषेनं मोठं केलं तिच्याकडेच बॉलिवूडचं दुर्लक्ष? मनोज वाजपेयी म्हणाला...

2020 मध्ये, अशी बातमी आली होती की त्रिशा आणि सिम्बू एकमेकांना डेट करत आहेत आणि लवकरच लग्नाची तयारी करत आहेत. मात्र, तसे काहीही झाले नाही. अभिनेत्याच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, दोघे फक्त चांगले मित्र आहेत. तिच्या लग्नाबद्दल बोलताना त्रिशा म्हणाली की ती अशा व्यक्तीसोबत लग्न करेल जो तिला पूर्णपणे समजून घेईल. जर योग्य पुरुष न मिळाल्यास ती आयुष्यभर कुमारीच राहील, असेही तिने सांगितले.