`आश्रम 3` सीरिजनंतर ईशा गुप्ताचा `हा` व्हिडीओ तुफान चर्चेत, Video Viral
`आश्रम 3` सीरिजमध्ये अभिनयाची जादू दाखवल्यानंतर ईशा गुप्ताच्या `त्या` व्हिडीओवर अनेकांच्या नजरा
मुंबई : अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या अभिनयाव्यतिरिक्त बोल्ड फोटो आणि व्हिडिओंसाठी ओळखली जाते. 'आश्रम 3' मध्ये 'सोनिया' च्या भूमिकेत झळकलेली ईशा आता पुन्हा हॉट आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे. ईशाच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये देखील अनेक हॉट आणि बोल्ड फोटो आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सर्वांच्या नजरा ईशाच्या नव्या व्हिडीओवर आहे.
व्हिडीओमध्ये ईशाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. व्हिडीओमधील तिच्या बोल्ड अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. तिच्या फोटोंवर अनेकांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. पाहा अभिनेत्रीचा नवा व्हिडीओ.
ईशाच्या कामाबद्दल सांगायचं झाल तर, नुकताचं ती 'आश्रम 3' मध्य दिसली होती. आता ईशा 'देसी मॅजिक' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. शिवाय ईशा 'हेरा फेरी 3' मध्ये देखील झळकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.