रणबीर कपूरची ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड दुसऱ्यांदा बनली आई, बाळाचा फोटो शेअर करत सांगितलं नाव
Evelyn Sharma Baby Boy Birth: रणबीर कपूरची ऑनस्क्रिन गर्लफ्रेंड अभिनेत्री इव्हलिन शर्मा हिनं गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सध्या तिनं आपल्या या गुडन्यूजचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्यांनी तिच्या या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Evelyn Sharma Baby Boy Birth: रणबीर कपूरच्या 'ये जवानी हैं दिवानी' या चित्रपटात भुमिका करणारी अभिनेत्री इव्हलिन शर्मा ही दुसऱ्यांदा आई झाली आहे. सोशल मीडियावरून तिनं आपली ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सध्या तिच्या या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. यावेळी तिनं आपल्या तान्ह्या बाळासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिनं आपल्या नवजात बाळाला कडेवर घेतले आहे आणि एक स्माई करत तिनं आपला आणि आपल्या बाळाचा फोटो शेअर केला आहे. यावेळी तिनं आपल्या लेकाचा फोटो दाखवलेला नाही. एका कपड्यात गुंडाळल्याप्रमाणे तिनं त्याला पकडलं आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी आणि कुटुंबिय तसेच मित्रपरिवारानं प्रेमाचा वर्षाव केला आहे. इव्हलिन शर्मा ही 36 वर्षांची आहे आणि तिनं दुसऱ्यांदा बाळाला जन्म दिला आहे.
इव्हलिन शर्मा हिनं आपल्या लेकाचे नावं हे Arden असं ठेवलं आहे. 2021 सोबत तिनं तुषार भिंडीसोबत लग्न केले आहे. तिनं तिच्या मुलीला अवा रामियाला याच वर्षी जन्म दिला होता. तिनं आपल्या लेकीसोबतचे अनेक फोटोही शेअर केले आहे. यावेळी ती आपल्या फॅमिली फोटोजमध्ये फारच खुश दिसत होती. ती सध्या ऑस्ट्रेलियाला असते. तिच्या लाडक्या लेकाचा आणि लेकीचा जन्मही तिथेच झाल्याचे कळते आहे. तुषार भिंडीही ऑस्ट्रेलियात राहणारा आहे. सध्या इव्हिलन शर्मा ही अभिनयापासून दूर आहे. सध्या तिनं आपल्या या लाडक्या लेकासोबत फोटो शेअर करत एक गोड कॅप्शनही लिहिलं आहे.
तिनं आपल्या या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''माझ्या लेकाला जन्म दिल्यानंतर मी स्वत:ला इतकी भाग्यवान समजेन असं मला वाटलं नव्हतं. आज मला खूप आनंद झाला आहे असं वाटतं आहे की मी उंचावरून उभं राहतं गाणं गाते आहे. माझ्या लाडक्या लेकाला हाय म्हणा, तान्हा मुलगा ज्याचं नावं आहे अर्डेन''
हेही वाचा - VIDEO: भुमी पेडणेकर बॉयफ्रेंडसोबत दिसताच नेटकऱ्यांना सुचले फक्त दोनच शब्द; म्हणतात, ''हसावं की रडावं?''
इव्हिलननं अनेक हिंदी आणि दाक्षिणात्त्य चित्रपटांतून कामं केली आहेत. परंतु तिची सर्वात जास्त ओळख ही 'ये जवानी हैं दिवानी' या चित्रपटातून दिसली होती. यावेळी रणबीर कपूरच्या गर्लफ्रेंडची भुमिका तिनं केली होती. त्यामुळे तिचा तो रोल प्रेक्षकांच्या लक्षात राहिला होता. आजही तो चित्रपट खूप लोकप्रिय आहे.
#newmom #babyboy #momlife #postpartum #happiness #lovinglife असे हॅशटॅग्सही तिनं दिले आहेत. तिच्या या फोटोखाली अनेक सेलिब्रेटींनी कमेंट्स केल्या आहेत.