VIDEO: भुमी पेडणेकर बॉयफ्रेंडसोबत दिसताच नेटकऱ्यांना सुचले फक्त दोनच शब्द; म्हणतात, ''हसावं की रडावं?''

Bhumi Pednekar Spotted with Boyfriend: भुमी पेडणेकर सध्या आपल्या बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली आहे. त्यामुळे तिची चर्चा रंगली आहे परंतु तिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला मात्र सपाटून ट्रोल करण्यात आलं आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 7, 2023, 01:31 PM IST
VIDEO: भुमी पेडणेकर बॉयफ्रेंडसोबत दिसताच नेटकऱ्यांना सुचले फक्त दोनच शब्द; म्हणतात, ''हसावं की रडावं?'' title=
July 7, 2023 | video viral bhumi pednekar spotted with boyfriend gets trolled for his looks (Photo: Zee News)

Bhumi Pednekar Spotted with Boyfriend: अभिनेत्री भुमी पेडणेकर सध्या आपल्या बॉयफ्रेंडमुळे चर्चांमध्ये आली आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. सध्या तिची पुन्हा एकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. काही दिवसांपुर्वी ती एअरपोर्टवर आपल्या बॉयफ्रेंडसोबत दिसली होती. आता पुन्हा एकदा तिच्या रूमर्ड बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली होती. भूमी पेडणेकर गुरूवारी एकासोबत स्पॉट झाली. पापराजी इन्टाग्राम पेज विरल भयानीनं याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती एका व्यक्तीसोबत स्पॉट झाली आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की भुमी यावेळी एका व्यक्तीसोबत कारमध्ये बसताना दिसते आहे. ती एका कॅफेबाहेरून यावेळी बाहेर पडताना दिसते आहे. विरल भयानीनुसार ही व्यक्ती भुमी पेडणेकरचा बॉयफ्रेंड असून यावेळी ती त्याच्यासोबत डेटवर गेलेली होती. ते दोघं डेटवरून परत घरी येताना स्पॉट झाले. यावेळी ते दोघंही कॅफेच्या बाहेर स्पॉट झाले होते. 

भुमीच्या आऊटफिटनं वेधलं लक्ष

यावेळी भुमी ही डेटला जातात त्याप्रमाणे आऊटफिट परिधान करून होती तिनं यावेळी ब्लॅक रंगाचा मिनी गाऊन परिधान केला होता. हा ड्रेस पायाच्या बाजूला कट असणारा होता. सोबतच बेल्टला पोनी होता. तिच्या ड्रेसवर डायमंडही जमकत होते. तिनं गळ्यात एक हलकंच लॉकेट घातलं होतं आणि हातात बॅग घेतली होती. सोबतच तिनं लाईट मेकअप आणि डिनर डेटला जाऊ असा मेकअप केला होता आणि केसही अगदी नीट बांधले होते. अगदी एखाद्या बाहुलीप्रमाणेच ती यावेळी दिसत होती. तिनं रेड लिपस्टिकही लावली होती. त्यामुळे तिच्या या आऊटफिटवरून तिनं डिनर डेटलाच गेली होती अशा चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. 

हेही वाचा - बॉलिवूड क्विन बनली पायलट! कंगनाचा बहुचर्चित चित्रपट 'तेजस' येणार 'या' तारखेला

बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाल्यानं भुमी पेडणेकर ट्रोल

यावेळी भुमी पेडणेकर ही ट्रोलही झाले आहे. ती ज्या व्यक्तीसोबत स्पॉट झाली आहे त्यानंही ब्लॅक रंगाचा आऊटफिट घातला आहे. सोबतच त्यानं काळा चष्माही घातला आहे. परंतु त्याच्या आऊटफिटनं मात्र तो चांगलाच ट्रोल झाला आहे. त्याचसोबत त्यामुळे भुमीलाही ट्रोल करण्यात आलं आहे. एका युझरनं लिहिलंय की, ''अरे हा बीएफ आहे की धारावीचा कोणी चरसी?'' तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, ''काय करावे हसावे की रडावे ह्याच्यापेक्षा दीपिक कलाल परवडला.'' तर तिसऱ्यानं लिहिलंय की, ''हा चोमू कोण आहे?''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावर्षी भुमी पेडणेकरचे 'अफवा' आणि 'भीड' हे दोन चित्रपट यावेळी प्रदर्शित झाले होते.