विक्की कौशल नाही तर `या` व्यक्तीसोबत कतरिना कैफ दिवसभर घालवतेय वेळ; चाहते हैराण
विकी कौशल हा बॉलिवूडचा खूप मोठा आणि प्रसिद्ध अभिनेता आहे.
मुंबई : विकी कौशल हा बॉलिवूडचा खूप मोठा आणि प्रसिद्ध अभिनेता आहे. जो केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये ओळखला जातो आणि प्रत्येकजण त्याचा खूप आदर करतो. आज जिथं पर्यंत विकी पोबचला आहे तिथे पोहचणं प्रत्येकालाच शक्य नाही. याचं कारण म्हणजे विकी कौशलने बॉलिवूडला एक नाही तर अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
विकी कौशल आजच्या काळात जगभर ओळखला जातो. विकी कौशलने नुकतंच प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफसोबत लग्न केलं आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशलची जोडी बॉलिवूडची सर्वात सुंदर जोडी मानली जाते.
कतरिना कैफच्या लग्नाला अवघे 6 महिने झाले आहेत आणि त्यातच कतरिना कैफबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कतरिना कैफ तिचा पती विकी कौशलसोबत नाही तर लग्नानंतरही इतर कोणासोबत तरी फिरत आहे. लग्न झाल्यानंतरही कतरिना तिचा पती विकी कौशलपासून लांब असताना कोणासोबत फिरत आहे.
कतरिना कैफने देखील बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. कतरिना कैफने बॉलिवूडला एक-दोन नव्हे तर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र सध्या ती एका व्यक्तीमुळे चर्चेत आहे. ज्याच्यासोबत ती लग्नानंतरही बराच वेळ घालवते.
असं सांगितलं जात आहे की, पती विकी कौशलपासून दूर असलेल्या कतरिना कैफ या व्यक्तीसोबत सुमारे २४ तास या व्यक्तीसोबत राहते एवढच नव्हेतर ती त्याच्यासोबत कधीही बोलू शकते, त्यामुळे मीडियामध्ये सध्या सर्वत्र चर्चा होत आहेत. या व्यक्तीबद्दल बोलायचं झालं तर त्याचं नाव दीपक सिंह आह., ज्याच्यासोबत कतरिना कैफ जवळपास दिवसभर राहते. कतरिना कैफ लग्नानंतरही संपूर्ण दिवस या व्यक्तीसोबत का घालवते.
कारण दीपक सिंग हा दुसरा तिसरा कोणी नसून कतरिना कैफचा खास माणूस म्हणजेच कतरिना कैफचा बॉडीगार्ड, जो तिच्यासोबत नेहमी राहून संरक्षण देण्याचं काम करतो. कतरिना त्याला महिन्याला लाखो रुपये देते. यामुळेच कतरिना कैफचा बॉडीगार्ड दीपक सिंग जवळपास दिवसभर कतरिनासोबत असतो असं म्हणता येईल.