Singham Again : रोहित शेट्टी 10 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतत आहे. 'सिंघम 3' या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता अजय देवगन पुन्हा एकदा सिंघम अवतारात पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सिंघम 2' 2014 मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर अजय देवगन याने 'सिम्बा' आणि 'सूर्यवंशी' या दोन चित्रपटांमधून सिंघमच्या भूमिकेत फक्त दोनच कॅमिओ केले आहेत. त्याच्या व्यक्तिरेखेची कथा आता 10 वर्षांनंतर पुढे सरकणार आहे. त्यामुळे अजय देवगनचे चाहते देखील प्रचंड उत्सुक झाले आहेत. दिवाळीमध्ये रिलीज होणाऱ्या 'सिंघम 3' या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. अजय देवगनच्या या चित्रपटातील एक झलक बघायला मिळाली आहे. रोहित शेट्टीने 'सिंघम 3' या चित्रपटासाठी एक मोठा करार केला आहे. 


रिलीजपूर्वीच 200 कोटींची कमाई


पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, रोहित शेट्टीने 'सिंघम 3' रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटामधून 200 कोटी रुपये कमावले आहेत. ही कमाई चित्रपटाच्या नॉन थिएट्रिकल डीलमधून झाली आहे. या अहवालात एका सूत्राने म्हटलं आहे की, अजय देवगन आणि रोहित शेट्टीसाठी हा सर्वात मोठा नॉन थिएट्रिकल डील करार आहे. चित्रपटाच्या जोरदार मागणीमुळे रोहितच्या चित्रपटांना मोठ्या डील मिळत आहेत. आता 'सिंघम 3' चित्रपटासाठी डिजिटल प्लेयर्सकडून मोठी डील मिळाली आहे.


रिपोर्टनुसार, 'सिंघम 3' चित्रपटाला म्यूझिक-सॅटेलाईट आणि डिजिटल अधिकारांसह एकूण 200 कोटी रुपयांची कमाई केल्याचे या अहवालातून समोर आले आहे. सूत्राने सांगितले की, 'सिंघम 3' बद्दल सर्वत्र उत्साह आहे. नॉन थिएट्रिकलच्या भागीदारांना विश्वास आहे की त्याच्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर रोहित शेट्टी आणि अजय देवगनच्या चित्रपटांना चांगले प्रेक्षक मिळाल्यामुळे त्याला इतर माध्यमांवरही चांगला प्रेक्षक मिळेल. 


कॉप यूनिवर्ससाठी प्रचंड उत्सुकता


'सिंघम' आणि 'सूर्यवंशी' या चित्रपटांसह रोहित शेट्टी आणि अजय देवगन यांच्या ब्रँड व्हॅल्यूसह 'सिंघम'मध्ये कॉप युनिव्हर्सच्या टॅगमुळे खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा त्यांना मोठा नॉन-थिएट्रिकल डील मिळाला आहे. रोहित शेट्टीच्या या चित्रपटाला कॉप युनिव्हर्सचा 'अ‍ॅव्हेंजर्स' क्षण म्हणूनही ओळखलं जात आहे. कारण त्यात त्याने तयार केलेले सर्व पोलिस पात्र एकत्र येणार आहेत. 


'सिंघम 3' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अजय देवगन, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, करीना कपूर, रणवीर सिंग आणि टायगर श्रॉफ असणार आहेत. सोशल मीडियावर अशा देखील बातम्या येत आहेत की, या चित्रपटात सलमान खान देखील चुलबुल पांडे अवतारात कॅमिओ करणार आहे.