सनी लियॉनीच्या कार्यक्रमासाठी `ते` कोर्टात जाणार
कन्नड संघटनांच्या प्रदर्शनानंतर १५ डिसेंबर ला `या`शोची परवानगी नाकारण्यात आली होती.
कर्नाटक : कर्नाटक सरकारच्या नव्या वर्षातील कार्यक्रमात बॉलीवूड अभिनेत्री सनी लियॉनीच्या 'शो' ला परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर आयोजकांनी कोर्टाचे दार ठोठावले आहे.
हा कार्यक्रम करण्याची अधिकाऱ्यांना परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. कन्नड संघटनांच्या प्रदर्शनानंतर १५ डिसेंबर ला 'या'शोची परवानगी नाकारण्यात आली होती.
'संस्कृतीवर घाला'
'अशा 'शो'आयोजन म्हणजे संस्कृतीवर घाल'असल्याचे कन्नड संघटनांचे म्हणणे आहे. पोलिसांची परवानगी मिळाल्यानंतरच कार्यक्रम होईल असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.
बंगळुरु महानगर पालिका आणि संबंधित विभागाच्या परवानगीची औपचारीकता झाल्यानंतरच कार्यक्रम होणार आहे.
कंपनीची मालकिण एच.एस. भाव्याने काल एक याचिका दाखल केली. यामध्ये तिने पोलिसांना 'शो'साठी परवानगी देण्यासाठी पत्र लिहिले आहे.