सरोगेट प्रेग्नंसी माहितीये पण सरोगेट Advertising काय असते माहितीये का?
Surrogate Advertising : दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थनं रजनीकांत, कमल हासन सरोगेट Advertising करत नाहीत! याविषयी वक्तव्य केलं पण Surrogate Adv म्हणजे काय? हे जाणून घेऊया...
Surrogate Advertising : बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीचा होणारा नवरा आणि दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा ‘हिंदुस्तानी 2’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे तब्बल 28 वर्षांनंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात पहिल्यांदा सिद्धार्थ आणि कमल हासन हे एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. पण यावेळी त्यानं दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं दाक्षिणात्य कलाकार कधीच मद्यपान, धूम्रपान आणि पान मसालाची जाहिरात करत नाही.
याविषयी बोलताना त्यानं सरोगेट जाहिराती असा शब्द वापरला, तर नक्की त्या शब्दाचा अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे त्याविषयी आज आपण जाणून घेऊया... सिद्धार्थनं 'न्यूज18 शोशा'ला दिलेल्या मुलाखतीत कमल हासन आणि रजनीकांत यांची स्तुती केली. त्यानं सांगितलं की आम्हाला आमच्या दिग्गज कलाकारांवर गर्व आहे.
दिग्गजांवर का गर्व आहे याविषयी सांगत सिद्धार्थ पुढे म्हणाला, "त्यांनी कायम आम्हाला योग्य मार्ग दाखवला आहे, उदाहरण द्यायचं झालं तर रजनी सर (रजनीकांत) आणि कमल सर (कमल हासन) यांनी अनेक वर्षांपूर्वी एक निर्णय घेतला होता आणि आजही ते त्यावर ठाम आहेत. हा निर्णय होता तो म्हणजे मद्यपान, धूम्रपान, पान मसाला सारख्या गोष्टींची सरोगेट अॅडव्हटाइजमेंट करायची नाही."
हेही वाचा : हेमा... नव्हे, 'ही' अभिनेत्री होती धर्मेंद्रच्या मनाची राणी, 58 वर्ष झाले तरी त्यांना विसरले नाही धरम पाजी
पुढे याविषयी बोलताना सिद्धार्थ म्हणाला, "जर त्यांनी मद्यपान, धूम्रपान आणि पान मसाल्याची जाहिरात केली तर दाक्षिणेतील इतर कलाकारांनी देखील असं केलं असतं. पण आता दाक्षिणात्य कलाकार या सगळ्याची जाहिरात यासाठी करत नाही कारण रजनी सर आणि कमल सरांनी हा नियम ठेवला आणि सगळे त्याचे पालन करतात." दरम्यान, सिद्धार्थच्या या वक्तव्याला बॉलिवूडशी जोडण्यात येत आहे.
सरोगेट Advertising म्हणजे काय?
सरोगेट अॅडव्हटाइजमेंट हा जाहिरातीचा एक प्रकार आहे. ज्याचा वापर हा सरकारी नियमांनुसार जाहिरात करण्यासाठी ज्या प्रोडक्ट्सवर किंवा वस्तूंवर मर्यादा आहे. त्यांच्या जाहिरातीसाठी याचा वापर करण्यात येतो. उदाहरण द्यायचं झालं तर सिगारेट, मद्यपानच्या ब्रॅंड त्यांच्या ब्रॅंडविषयी सगळ्यांना कळावं त्यासाठी ते त्यांच्या कंपनीतील दुसऱ्या प्रोडक्टची जाहिरात करतात. त्यामुळे सगळ्यांना त्यांच्या ब्रॅंडविषयी कळतं. सोप्या भाषेत याला फसव्या जाहिराती किंवा Misleading Advertising असंही म्हणतात.