Not Hema But This Actress Was Dharmendra's Favourite : बॉलिवूडचे लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली. त्यानंतर त्यांनी शोले, धर्मवीर, लोहा, हुकुमत, मेरा गाव मेरा देश आणि आंखे सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांवेळी त्यांनी वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत काम केलं. पण तुम्हाला माहितीये का 88 वर्षी अभिनेत्री धर्मेंद्र यांच्या मनात घर करून होत्या. त्या कोण होत्या ज्यांना तब्बल 58 नं वर्षांनंतर देखील धर्मेंद्र विसरू शकले नाही. धर्मेंद्र त्यांना कधी विसरु शकले नाही आणि त्यांना फेव्हरेट म्हणाले. ही अभिनेत्री दुसरी कोणी नाही उमा देवी या आहेत. उमा या टुन टुन या नावानं ओळखल्या जायच्या.
खरंतर, द कपिल शर्मा या कॉमेडी शोमध्ये जेव्हा धर्मेंद्र पोहोचले होते, तेव्हा त्यांना विचारण्यात आलं होतं की त्यांची आवडती अभिनेत्री कोण आहे? तेव्हा त्यांची दोन्ही मुलं सनी देओल, बॉबी देओल त्यांच्याकडे पाहात राहिले कारण त्यांना पण जाणून घ्यायचं होतं की धर्मेंद्र हे कोणत्या अभिनेत्रीचं नाव घेत आहेत. अनेक चाहत्यांना आशा होती की ते हेमा मालिनी यांचं नाव घेतील. पण असं झालं नाही आणि धर्मेंद्र यांनी 'टुन टुन यांचं' नाव घेतलं. खरंतर हे पहिल्यांदा घडलं नाही, जेव्हा धर्मेंद्र यांनी टुन टुन यांचं नाव घेतलं. या आधी त्यांनी आधीच्या ट्विटर म्हणजेच आताच्या X अकाऊंटवरुन त्यांनी चित्रपटाच्या एका सीनचा फोटो शेअर केला होता. त्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिलं होतं की " 'टुन टुन जी' माझ्या सगळ्यात आवडत्या डार्लिंग आहेत. मला अशाच गोड लोकांची आठवण येते... पण आयुष्य हे थांबत नाही."
TunTun ji , was my most darling heroine. I miss such loving persons ….. but life goes on and on ….. pic.twitter.com/hJq1AGk0Ky
— Dharmendra Deol (@aapkadharam) December 29, 2021
ज्या लोकांना याविषयी माहित नाही की त्यांच्यासाठी म्हणून की टुन टुन या चित्रपटसृष्टीतील सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फिर याद किया' या चित्रपटात काम केलं होत. चित्रपटात धर्मेंद्र यांच्याशिवाय रहमान, नूतन, जीवन सारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. तर या चित्रपटात धर्मेंद्र आणि नूतन यांचा डबल रोल होता. धर्मेंद्र यांच्या एका भूमिकेचं नाव अशोक आणि दुसऱ्या भूमिकेचं नाव भोला असं होतं. तर भोला ही भूमिका टून टून यांच्या पतीची होती.
हेही वाचा : न्यूयॉर्कमध्ये फॅनवर खरंच संतापला शाहरुख खान? VIDEO शेअर करणाऱ्यानं केला खुलासा
दरम्यान, टून टून यांचा जन्म 11 जुलै 1923 रोजी झाला. त्यांनी 'दर्द', 'बाबुल', 'उडन खटोला', 'मिस्टर एंड मिसेज 55', 'गीत हलचल' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तर वयाच्या 80 व्या वर्षी म्हणजेच 24 नोव्हेंबर 2003 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.