`सगळं कठीण होवून बसतं`... कुणाल खेमूकडून करिनाबाबतचं मोठं Secret उघड
कुणाल खेमूचं पतौडी कुटुंबाशी खूप जवळचं नातं आहे.
मुंबई : कुणाल खेमूचं पतौडी कुटुंबाशी खूप जवळचं नातं आहे. पतौडी कुटुंब हे कुणाल खेमूचं सासर आहे. कुणालने 2015 मध्ये अभिनेत्री सोहा अली खानशी लग्न केलं आणि तो पतौडी कुटुंबाचा जावई बनला. अभिनेता नेहमी खान कुटुंबासोबत आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.
दरम्यान, आता कुणाल खेमूने या कुटुंबाबाबत मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत कुणाल खेमूने म्हटलं आहे की, जेव्हाही मी सोहासोबत माझ्या सासरच्या घरी जातो तेव्हा तिथलं डायनिंग टेबल एखाद्या कॉमेडी शोचं स्टेज बनलेलं असतं.
जेव्हा सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूर हे दोघं सोबत जेवायला बसलेले असतात. तेव्हा हे घडतं. खूप जोक्स चालू असतात. 'करीना कपूर खूप मजेदार आहे. आता मी देखील या कुटुंबाचा एक भाग आहे. सुरुवातीला ती लाजाळू वाटेल पण तुम्हाला नंतर कळेल. ती खरोखर खूप मजेदार आणि विनोदी आहे. अनेकवेळा असं घडलं आहे की, आम्ही जेवत असतो, पण आपल्याला जेवायला मिळालं नाही कारण ती इतके विनोद पास करते की ते सगळं कठीण होवून बसतं.
अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, कुणाल खेमू ओटीटीवर रिलीज झालेल्या 'अभय' या वेब शोमध्ये यूपी पोलिस एसपी अभय प्रताप सिंगच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय तो 'कंजूस मक्कूस' आणि 'मलंग 2' सारख्या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर, करीना कपूर खान 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये तो आमिर खानसोबत दिसणार आहे.