मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाचं वृत्त संपूर्ण कलाविश्वाला धक्का देऊन गेलं. सुशांतचा वावर आणि त्यानं या कलाविश्वात आणि प्रत्येकाच्याच मनात निर्माण केलेलं स्थान मात्र आजही अबाधित आहे. यापुढंही ते तसंच राहणार आहे. सुशांतच्या निधनानं सर्वाधिक धसका हा त्याच्या जवळच्या व्यक्तींनी घेतला. यामध्ये त्याच्या कुटुंबापासून अगदी पूर्वाश्रमीची प्रेयसी अर्थात एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिच्याही नावाचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बी- टाऊनच्या या अभिनेत्याच्या निधनाचं वृत्त कळतात अंकिताला यायवर विश्वास बसला नव्हता. काही दिवसांपूर्वीच तिनं या दु:खातून सावरत सुशांतसाठी एक भावनिक पोस्टही केली होती. 


आता अंकितानं पुन्हा एकदा तिच्या आयुष्यातील या अतिशय खास व्यक्तीसाठी आणखी एक पोस्ट केली आहे. देवापुढं, दिवा लावत तिनं सुशांत जिथे कुठे आहे, तिथे आनंदात राहो, अशी प्रार्थना केली आहे. अंकिताही ही पोस्ट पाहता ती अजूनही सुशांतच्या जाण्याच्या वास्तवाचा तिच्याच परिनं स्वीकार करत आहे, हे कळत आहे. 



 


जवळपास सहा वर्षांसाठी अंकिता आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये होते. ज्यानंतर काही कारणास्तव त्यांच्या नात्यात दुरावा आला. सुशांतसोबतच्या नात्यात दुरावा आल्यानंतर या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. पण, त्याच्या निधनाचं वृत्त कळताच झाल्या सर्व गोष्टी मागे सारत अंकितानं त्याच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी थेट सुशांतचं घर गाठलं होतं. इतकंच नव्हे, तर त्याच्या निधनानंतर काही दिवस तिनं एकटं राहणं पसंत केलं होतं.