इंटीमेट सीनसाठी या प्रसिद्ध अभिनेत्रीला केली होती Ex husband ने मदत म्हणाली, `मी डोळे...`
अभिनेत्रीने खुलासा केला आहे की, एका वेब सीरिजमध्ये तिने केलेल्या इंटिमेट सीन्सला तिचा एक्स पती खूप सपोर्ट करत होता
मुंबई : आभिनेत्री कीर्ती कुल्हारीने अभिनयाच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कीर्ती तिच्या अभिनयाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. एकदा तिने तिचा पती साहिल सेहगल याच्यापासून वेगळं होत असल्याची घोषणा केली आणि सगळ्यांनाच मोठा धक्का दिला. मात्र, आता तिचे आणि तिच्या एक्स पतीमधील नाते आता सामान्य झाले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कीर्तीने तिच्या आयुष्यातील गोष्टींचा खुलासा केला.
पती साहली सहगलपासून वेगळे झाल्यानंतर ही अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात आली होती. मात्र घटस्फोटानंतरही कीर्तीने तिच्या एक्स पतीसोबत चांगले संबंध ठेवले आहेत. अलीकडेच, अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या आणि 'फोर मोअर शॉट्स प्लीज' या वेब सीरिजमध्ये इंटिमेट सीन करण्यासाठी तिच्या एक्स पतीने तिला कशी मदत केली हे सांगितलं.
''माझं 2016 साली लग्न झालं आणि माझा पती साहिलने मला खूप सपोर्ट केला. तो असा व्यक्ती नाहीये, जो म्हणेल की, तू स्क्रीनवर किस करू शकत नाही किंवा इंटीमेट सीन देऊ शकत नाही. कारण आपल्या समाजात हे खूप पाहिलं जातं. मला हा विचार खूप मागासलेला वाटतो. ही व्यक्तिरेखा साकारताना त्याने मला खूप साथ दिली आणि माझ्यावर खूप विश्वास दाखवला. या भूमिकेसाठी मी तयार झाले ते फक्त आणि फक्त त्याच्यामुळेच.'' एका मुलाखतीमध्ये बोलताना अभिनेत्रीने सांगितलं होतं.
आता माझ्यासाठी सगळं नॉर्मल आहे
कीर्ती पुढे म्हणाली की, 'फोर मोअर शॉट्स'मध्ये बोल्ड सीन्स पाहण्याचा प्रत्येक मुलीचा दृष्टीकोन वेगळा होता. काहींना यात संकोच वाटत होता तर काहींना त्रास झाला नाही. मी अशा स्थितीत होते ज्यामध्ये ती सोयीस्कर होती. मी डोळे उघडे ठेवून सीनमध्ये प्रवेश करत होते. आज माझ्यासाठी से-क्सची कल्पना सामान्य झाली आहे. पण मी ज्या पद्धतीने मोठी झाले, त्यामुळे मला इंटिमेट सीन्स करणं फारसं पटत नव्हतं.
भावूक होणं ही समस्या नाही
अभिनेत्री पुढे म्हणाली की, साहिलने मला दुसऱ्या लग्नाच्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं हे सांगितलं. मी खूप भावनिक माणूस होते. मी माझ्यातील भावनिक अतिसंवेदनशील भावनिक व्यक्तीला सोडून दिलं आहे भावनिक होणं ही समस्या नाही. मात्र, जर तुम्हाला याला कसं सामोरं जावं हे माहित नसेल तर ते तुमच्यासाठी समस्या असू शकतं.