Extramarital Affair चा कळस... माझा पती तुला, तुझा पती मला...
Extramarital Affair : पती ऑफिसवालीमध्ये गुंतला; पत्नी ऑफिसवालीच्या नवऱ्यासोबत फरार
Extramarital Affair : जोडीदारापासून विवाहबाह्य संबंध लपवत जगणारे अनेक जण असतात. हे संबंध कधी तरी उघडकीस येतातच. जेव्हा विवाहबाह्य संबंध जगासमोर आल्यानंतर चांगल्या नात्यामध्ये कटूता निर्माण होते. पण काही वेळा असे प्रेम प्रकरण समोर येतात ज्यावर विश्वास ठेवणं फार कठीण असतं. असंच एक प्रकरण समोर आलं, यामध्ये पतीचं ज्या महिलेसोबत अफेअर होतं, त्याच महिलेच्या पतीसोबत पत्नीचं अफेअर असल्याचं समोर आलं. एवढंच नाही तर, दोघे पळून देखील गेले.
लॉकडाऊनमध्ये सुरु झालं प्रेम प्रकरण
ही घटना ब्रिटनमधील एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेने स्वतः तिच्या सोशल मीडियावर याबद्दल सांगितले आहे. महिलेने सांगितले की, हे सर्व कोरोना महामारीच्या लॉकडाऊन दरम्यान सुरू झालं. जेव्हा पतीला नोकरी मूळे महिलेला वेळ देता येत नव्हता. एवढंच नाही तर, पती सतत तिच्यावर नाराज असायचा.
एक दिवस अचानक एका पुरुषाला महिलेचा फोन आला आणि तिने सांगितले की ती महिला तिच्या पतीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे ऐकून महिलेने फोन ठेवला आणि खूप अस्वस्थ झाली. ज्याचे तिच्या पतीसोबत अफेअर होते, ती त्याच्यासोबत ऑफिसमध्ये काम करायची. तिच्या बाईने त्या महिलेच्या नवऱ्याला तिच्या वतीने बोलावले आणि हळू हळू ती त्याच्याशी बोलू लागली.
एक दिवस महिला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि त्या व्यक्तीने महिलेला पतीच्या अफेअर बद्दल सर्व काही सांगितलं. पतीचं विवाहबाह्य संबंध कळताच महिलेला धक्का बसला. ज्या महिलेसोबत पतीचं अफेअर होतं, दोघे एकाच ऑफिसमध्ये काम करत होतेय.
त्यानंतर महिलेने स्वतःहून पतीच्या गर्लफ्रेंडच्या पतीला फोन केला आणि त्या दोघांचं प्रेम प्रकरण सुरु झालं. दोघे एकत्र फिरायला जाऊ लागले, सिनेमा पाहायला जावू लागले. हळूहळू ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग एक दिवस महिला पतीच्या गर्लफ्रेंडच्या पतीसोबत पळून गेली.