मुंबई : अनुष्का शर्मा सध्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र तिची झलक सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळते. अनुष्का शर्मा अनेकदा तिच्या क्यूट लुक्सने चाहत्यांना भुरळ घालते. लग्नानंतर अभिनेत्रीच्या सौंदर्याला चार चाँद लागले आहेत. प्रत्येकवेळी ती आधीपेक्षा खूप सुंदर दिसते.असं म्हणायला काहिच हरकत नाही.  पण कधी-कधी सुंदर दिसण्याच्या नादात ती Oops Moment ची शिकार होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्का Oops Moment ची शिकार
'रब ने बना दी जोडी'मधून बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते. इंडियन पासून वेस्टर्न कपड्यात अनुष्का आपल्या लूकने चाहत्यांना घायाळ करते. पण अनुष्का शर्माला कधी-कधी फॅशन करणं महागात पडलं आहे. ती साडी नेसून एका फंक्शनला गेली होती. जिथे अनुष्काला तिचा ब्लाउज डीपनेक असल्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. पण आज आम्ही तुम्हाला अनुष्काच्या या फोटोमागचं सत्य सांगणार आहोत. अभिनेत्रीचे हा फोटो खरा नसून या फोटोंवर फोटोशॉप करुन एडिट करण्यात आलं आहे. 



फेक आहेत हे फोटो
2019 मध्ये एका अवॉर्ड फंक्शनमध्ये अनुष्का शर्माने सुंदर हिरव्या रंगाची साडी नेसली होती. या साडीत ती खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीचा बॅकलेस ब्लाउजही तिच्या अंगावर खूप खुलून दिसत होता. पण या फंक्शननंतर अनुष्काचे अनेक फेक फोटो व्हायरल होऊ लागले. ज्यामध्ये अभिनेत्रीने खूप डिपनेक ब्लाउज घातल्याचं दिसत होतं.