मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला गेल्या वर्षी ड्रग्स प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. या प्रकरणी आर्यनला जवळपास 1 महिना तुरुंगात राहावं लागलं होतं. आता आर्यन पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिसणारी व्यक्ती आर्यन खान असल्याचं सांगितलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अमेरिकेतील विमानतळावर एक व्यक्ती नशेच्या अवस्थेत लघवी करताना दिसत आहे. सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीला आर्यन खान असल्याचं म्हणत आहेत आणि हा व्हिडिओ शेअर करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून अनेकजण आर्यन खानला ट्रोल करत आहेत. आर्यन खानचं नाव बदनाम केलं जात असल्याचा आक्षेप काही लोक घेतआहेत.


मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, सार्वजनिक ठिकाणी लघवी करणारी ही व्यक्ती आर्यन खान नसून प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट ''ट्वाइलाइ' फेम ब्रॉनसन पेलेटियर आहे. हा व्हिडिओ 2012 सालचा आहे जेव्हा ब्रॉन्सनने लॉस एंजेलिस विमानतळावर नशेच्या अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी लघवी केली होती.



आर्यन खानला एनसीबीने ३ ऑक्टोबरला अटक केली होती. यानंतर आर्यन खान जवळपास 1 महिना आर्थर रोड जेलमध्ये होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले होते. 2021 मध्ये आर्यन खान गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा दुसरा सेलिब्रिटी ठरला होता.