Fact Check Athiya Shetty and KL Rahul Wedding Gifts: बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टीने (Athiya Shetty) बॉयफ्रेंड आणि क्रिकेटपटू केएल राहुलशी (KL Rahul) सोमवारी 23 जानेवारी रोजी सप्तपदी घेतल्या. खंडाळा येथे असलेल्या सुनील शेट्टी यांच्या फार्महाऊसवर लग्न केलं आहे. अथिया आणि केअल राहुलच्या लग्नानंतर लगेचच त्या दोघांना कोण कोणत्या भेटवस्तू मिळाल्या आणि त्या कोणी कोणी दिल्या अशा बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. दरम्यान, यावर सुनील शेट्टी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Athiya Shetty And KL Rahul Wedding) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अथिया आणि केअल राहुलला सलमान खान, विराट कोहली यांनी या दोघांना खूप महागडे गिफ्ट दिले आहेत. अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. सुनील शेट्टी यांनी अथिया आणि केअल राहुला 50 कोटींचा फ्लॅट गिफ्ट म्हणून दिला. याशिवाय, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि महेंद्र सिंह धोनी यांनी देखील महागडे गिफ्ट दिल्याचं म्हटलं जात होतं. 


हेही वाचा : 'पाकिस्तान आणि ISIS...,' 'पठाण'वरून Kangana Ranaut हिने Shahrukh Khan ला डिवचलं...


अथिया आणि केएल राहुलला मिळाले हे गिफ्ट्स


1. मुंबईती 50 कोटी किंमतीचे आलिशान घर 
2. लक्झरी कार
3. महागडी घड्याळे आणि बाइक्स 
4. डायमंड ब्रेसलेट


काय म्हणाले सुनील शेट्टी


मात्र, या सगळ्या अफवा असल्याचे सुनील शेट्टी यांनी म्हटले आहे. हा खुलासा सुनील शेट्टी यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. यावेळी सुनील शेट्टी म्हणाले, गिफ्टविषयी ज्या बातम्या समोर येत आहेत. त्या सगळ्या फक्त अफवा आहेत. अशा बातम्या देण्याआधी एकदा आम्हाला विचारा असे ते म्हणाले आहेत.  अलीकडेच अथिया शेट्टी आणि सुनील शेट्टी यांनी लग्नाचे अनेक फोटो शेअर केले आहेत आणि त्यासोबतच त्यांच्या भावनिक पोस्ट्सही चर्चेत आहेत.


हनिमूनला न जाण्याचा घेतला निर्णय...


केएल राहुलने हनिमूनपेक्षा क्रिकेटला प्राधान्य दिलं आहे. आगामी क्रिकेट स्पर्धेसाठी या नवविवाहित जोडप्याने हनीमूनला जाणं रद्द केलं आहे. याशिवाय लग्नानंतर राहुल आणि अथिया नवीन बिझनेस सुरु करणार आहेत. त्यासाठी हे दोघे हनीमूनला जाणार नाही आहेत. दरम्यान केएल राहुलने लग्नासाठी श्रीलंकेविरुद्ध मालिका सोडली होती. पण आता तो लग्नानंतर पुन्हा सराव सुरु करणार आहे. या दोघांनी कामाला प्राधान्य देऊन आपला हनिमून प्लॅन काही काळासाठी पुढे ढकलला आहे