पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांनी गुपचूप बांधली लग्नगाठ?
पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल हे अनेकदा त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे चर्चेत असतात
मुंबई : 'इंडियन आयडॉल 12' या सिंगिंग रिअॅलिटी शोमधील लोकप्रिय गायक पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल हे अनेकदा त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे चर्चेत असतात. दरम्यान, या कपलचे काही फोटो सोशल मीडियावर आगीसारखी पसरत आहेत. ज्यामध्ये लग्नाच्या गेटअपमध्ये दिसत आहेत.
फोटो पाहून असा अंदाज लावला जात आहे की, कोविडमुळे या कपलने अतिशय खास लोकांच्या उपस्थितीत गुपचूप लग्न केलं आहे. मात्र, हा फोटो खरा नसून एडिट केला गेलेला फोटो आहे. दोघांच्या चाहत्यांनी एडिट केलेला हा फोटो आहे. नुकतीच पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती. त्यामुळे दोघांच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली होती. हे पाहून एका चाहत्याने हा फोटो एडिट केला असून, या कपलच्या चाहत्यांना तो व्हिज्युअल ट्रीट देताना दिसत आहे.
पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आल्यापासून चाहत्यांना दोघांना एकत्र पाहण्याची इच्छा होती. अशा परिस्थितीत हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसंच, हा फोटो खरा असला पाहिजे, असं वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांचे चाहते करत आहेत. अरुणिता पवनदीपचा खरं लग्न पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूपच उत्सुक आहेत.
व्हायरल होत असलेला फोटो खोटा आहे, तो पाहून तुमची फसवणूक होईल. दोन्ही सिंगर त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत. मात्र, या फोटोवर पवनदीप किंवा अरुणिताकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पवनदीप राजन 'इंडियन आयडॉल 12' चा विजेता ठरला आहे. त्याचवेळी अरुणिता कांजीलाल ही उपविजेती ठरली. शोदरम्यान आणि शो संपल्यानंतर दोघांच्या केमिस्ट्रीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.