प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका?
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी सोशल मीडियावर आगीसारखी व्हायरल होत आहे.
मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी सोशल मीडियावर आगीसारखी पसरत होत आहे. या बातम्या पाहिल्यानंतर आणि वाचून त्यांचे चाहते नाराज झाले आहेत. प्रत्येकाला त्यांच्या प्रकृतीची स्थिती जाणून घ्यायची आहे. पण उदित नारायण यांना खरोखरच हृदयविकाराचा झटका आला आहे का? किंवा ही केवळ अफवा आहे. तर आता आम्ही तुम्हाला व्हायरल होत असलेल्या या बातमीमागचं सत्य काय हे तुम्हाला सांगणार आहोत.
वास्तविक, गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या बातम्या पाहिल्यानंतर गायकाचे चाहते काळजीत पडले आहेत. प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे की, हे नेमकं काय प्रकरण आहे? तर आम्ही तुम्हाला सांगतो की, अजिबात काळजी करण्याची गरज नाही, उदित नारायण यांना हृदयविकाराच्या झटक्याची बातमी पूर्णपणे चुकीची आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. उदित नारायणच्या व्यवस्थापकाने या गोष्टींना नकार दिला आहे.
उदित नारायण यांच्या मॅनेजरने सांगितलं की, त्यांची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे आणि गायकाला काहीही झालेलं नाही. या अफवांना पूर्णविराम देत तो म्हणाला की, अशा बातम्या कुठून व्हायरल होत आहेत हे मला माहीत नाही. त्याला सतत कॉल येत आहेत आणि ट्विटरवर अनेक बातम्या व्हायरल होत आहेत, त्यानंतर त्यांनी उदित नारायण यांच्याशी चर्चा केली. अशा परिस्थिती ते खूप अस्वस्थही दिसत होते.
मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, या अफवा नेपाळमधून पसरवल्या जात असल्याचं त्यांना वाटतं. कारण ज्या क्रमांकावरून हा संदेश पाठवला जात आहे तो नेपाळचा कोड नंबर आहे. अशा चुकीच्या बातम्या देऊन लोकांना कोण आणि का त्रास देत आहे. याची काळजी त्यांच्या व्यवस्थापकालाही काल रात्रीपासून लागली आहे.