अखेर उर्वशी रौतेलाच्या गळ्यावरील लव्हबाईटमागचं सत्य समोर
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या सौंदर्य आणि फॅशन सेन्ससाठी सोशल मीडियावर ओळखली जाते.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या सौंदर्य आणि फॅशन सेन्ससाठी सोशल मीडियावर ओळखली जाते. नुकताच, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता ज्यामध्ये ती चालताना दिसत आहे. उर्वशी एअरपोर्टवर स्पॉट झाल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.
व्हॅलेंटाइन वीकमध्ये उर्वशीने स्वतः तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये अभिनेत्री लाल रंगाचा स्लीव्हलेस टॉप आणि काळ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट परिधान केल्याचं दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या मानेवर एक खूण दिसत आहे. ज्याला लोकं लव्हबाईट म्हणत आहेत. एका पोर्टलनेही हा व्हिडीओ अशाचप्रकारे शेअर केला होता. जे पाहून अभिनेत्रीचा राग अनावर झाला आहे. उर्वशीच्या या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या खुणांवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर संताप व्यक्त केला आहे.
अभिनेत्रीने ट्विट करत लिहीलं ''ही माझ्या लाल लिपस्टिकची खूण आहे जी माझ्याच मास्क मुळे पसरली आहे. लिपस्टिकला हँण्डल करणं कठिण आहे. कुठल्या पण मुलीला विचारा. मला यावर विश्वासच बसत नाहीये की, कुणाची ईमेज खराब करण्यासाठी कोणी काहीही बोलेले. विशेषतः मुलीची. तुमच्या फायद्यासाठी खोट्या बातम्या पसरवण्याऐवजी तुम्ही माझ्या यशाबद्दल का लिहीत नाही?''
उर्वशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे मनमोहक फोटो आणि व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. यापूर्वी अभिनेत्रीचे टायगर प्रिंट ड्रेसमधील काही फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.