पतीपासून विभक्त झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा लग्नबंधनात? व्हिडिओ समोर
सध्या एकच चर्चा...
मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री संजीदा शेख ही इंडस्ट्रीतील सगळ्यात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने देशभरातील प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केलं आहे. पण त्याचबरोबर लोकं तिच्या अभिनयाचेही चाहते आहेत. तिची बोल्ड स्टाइल चाहत्यांना प्रचंड आवडते.
संजिदा अनेकदा बोल्ड लूकमध्ये दिसते
संजीदाचे चाहते तिला पडद्यावर पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. ही अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या बहुतेक पोस्टमध्ये ती बोल्ड लूकमध्ये दिसते. मात्र यावेळी संजीदा वधूच्या अवतारात दिसत आहे.
संजीदाने नुकतंच इन्स्टाग्रामवर तिच्या फोटोसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये संजीदाने लाल रंगाचा प्रँकस्टर परिधान केल्याचं दिसत आहे. ज्याचा दुपट्टा तिने डोक्यावर घेतला आहे. यासोबत तिने हलक्या वजनाचे दागिने घातले आहेत. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी संजीदाने एका हातात भरपूर बांगड्या घातल्या आहेत. तर दुसरा हात रिकामा ठेवला आहे.
लूक व्हायरल
फार कमी वेळातच संजीदाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. संजीदाचा हा ड्रेस रजा शरीफीने डिझाइन केला आहे. तर तिचा मेकअप तुलसी सोलंकीने केला आहे. तुलसीने तिच्या इन्स्टा पेजवर संजीदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा पूर्ण लूक दिसत आहे. या स्टाईलमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. हा लूक तिने फोटोशूटसाठी केल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे अभिनेत्री लग्न करत नसून हा लूक फक्त फोटोशूटसाठीचा आहे.