James Cameron and S. S. Rajamaoli: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती आरआरआर या चित्रपटाची. या चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजमौली यांना आता जगात मोठी ओळख प्राप्त झाली आहे. नुकत्याच संपन्ना झालेल्या गोल्डन ग्लॉब या पुरस्कार सोहळ्यात आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला हा जागतिक नामवंत पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे सध्या सगळीडेच या चित्रपटाची आणि खासकरून एस.एस.राजमौली यांचीच हवा आहे. ऐवढेच नाही तर या पुरस्कार सोहळ्याला आलेल्या जगप्रिसद्ध दिग्दर्शक स्टिवन स्पेल्सबर्ग आणि टायटॅनिकचे दिग्दर्शक जेम्स कॅमरॉन यांची भेटही राजमौली यांनी घेतली. यावेळी स्टिवन स्पेल्सबर्ग यांच्याप्रमाणे जेम्स कॅमरॉन यांनीही राजमौली यांचे आणि त्यांच्या चित्रपटकौशल्याचे भरभरून कौतुक केले आहे.या हे क्षण टिपल्याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (
Famous american director james cameron praises s s rajamouli video goes viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी आरआरआर या चित्रपटाचे कौतुक करताना जेम्स कॅमरॉन यांनी एस. एस. राजमौली यांच्याशी बातचीत केली त्यात त्यांनी राजमौली यांच्या चित्रपटकौशल्याचे भरभरून कौतुक केले आहे. यावेळी आपल्या चित्रपटाचे कौतुक ऐकून राजमौली भरावून गेले. त्यांनी जेम्स कॅमरॉन यांना त्यांचे चित्रपट किती आवडतात याबद्दल सांगितले. त्याचबरोबर त्यांनी केलेले कौतुक ऐकून कशाप्रकारे त्यांचे शब्द आपल्यासाठी एक पुरस्कारापेक्षा कमी नाहीत. तुम्ही आमच्या चित्रपटाबद्दल एवढे चांगले उद्गार काढले हे आमच्यसाठी खूप मौल्यवान आहे, असे जेम्स कॅमरॉन यांच्याशी संवाद साधताना राजमौली यांनी काढले. 


आरआरआर या चित्रपटानं आत्तापर्यंत 1200 कोटींपेक्षा जास्त बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. त्यांच्या चित्रपटाला गोल्डन ग्लोब हा पुरस्कार तर मिळाला आहेच पण त्याचसोबत क्रिटिक्स चॉईस पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आले आहे. 28 व्या क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्समध्ये 'बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म' आणि 'सर्वोत्कृष्ट गाणे' पुरस्कारही जिंकले.


काय म्हणाले जेम्स कॅमरॉन? 


तुमच्या चित्रपटातील पात्रांना पाहणं म्हणजे काहीतरी वेगळंच फिल करण्यासारखे आहे ही एक विशेष भावना आहे. तुमचा सेटअप म्हणजे आग, पाणी, कथा, एकामागून एक नव्याने साकारलेल्या गोष्टींचे प्रकटीकरण, मग ती पात्र  काय करत आहेत याच्याकडे पाहणे मग पार्श्वकथा, ट्विस्ट आणि टर्न आणि पात्रांची मैत्री. हे करणं खूप सामर्थ्यवान आहे आणि मला तुमच्यातली ही एक गोष्ट आवडते की तुम्ही या संपूर्ण चित्रपटात सर्वकाही ठेवले आहे.



मला ते आवडते. तुमचा देश आणि तुमच्या घरातील प्रेक्षकांना किती अभिमान आणि सामर्थ्य वाटत असेल याची मी फक्त कल्पना करू शकतो. तुम्हाला जगाच्या शीर्षस्थानी वाटत असेल.'' असे उद्गार जेम्स कॅमरॉन यांनी काढले. यासोबत राजमौली यांना त्यांनी आपल्याकडे येऊन चित्रपट करण्याची ऑफरही दिली.