मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन आणि उत्तर प्रदेशातील फिल्म विकास परिषदेचे प्रमुख राजू श्रीवास्तवला (Raju Srivastava) एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. राजू श्रीवास्तवच्या म्हणण्यानुसार, त्यांना आणि त्यांचे सहयोगी अजीत सक्सेना आणि गरवित नारंग यांना देखील धमकीचे फोन आले आहेत. व्हाट्सऍप कॉलद्वारे संबंधीत व्यक्तींना फोन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी कानपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस याबाबत तपास करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सात वर्षांपूर्वीदेखील राजूला असाच धमकीचा फोन आला होता. तेव्हा राजूने फोन करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्रामध्ये एफआयआर देखील दाखल केली होती. पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे त्याने गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. आता त्याच्या मुलांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे.


आता त्याच्या मुलांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिवाय लखनौच्या कमलेश तिवारीसारखी परिस्थिती करु असंही, या अज्ञात इसमाने म्हटलं आहे. सांगायचं झालं तर ज्या नंबरवरून फोन आला होता, तो नंबर पाकिस्तानमधील कराची शहरातील असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.