Pathaan review: पठाणमधील शाहरूखच्या बॉडीवर अनुराग फिदा, म्हणाला `आरारारारर.. खतरनाक`
Pathaan Movie Review Shah Rukh Khan: चित्रपट पाहिल्यानंतर अनुराग थिएटरमधून बाहेर पडताना दिसला. त्यांनी थिएटरबाहेर थांबून माध्यमांशी संवाद (Anurag Kashyap On Paathan) साधला.
Pathaan Movie review: तब्बल चार वर्षानंतर बॉलिवूडचा किंग शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आज किंग खानचा पठाण (Pathaan) हा सिनेमा देशातील कानाकोपऱ्यात प्रदर्शित झाला आहे. अशातच किंग खानची जादू पहिलाच्या दिवशी सिनेमागृहाबाहेर पहायला मिळाली. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं पहायला मिळतंय. दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) देखील सिनेमात पहायला मिळतील. अशातच प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) मोठं वक्तव्य केलंय. (Famous director Anurag Kashyap Review on Shah Rukh Khan Pathaan Movie marathi news)
टायगरच्या भूमिकेत सलमान खानची (Salman Khan) भूमिका हे या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण आहे. उत्साही प्रेक्षकांप्रमाणेच, आजच्या सुरुवातीला अनेक सेलिब्रिटींनीही पठाण पाहिला. त्यावर अनेकांनी रिव्ह्यू (Pathaan Review) देखील दिले आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर अनुराग थिएटरमधून बाहेर पडताना दिसला. त्यांनी थिएटरबाहेर थांबून माध्यमांशी संवाद (Anurag Kashyap On Paathan) साधला. किंग खानवर कौतुकाचा वर्षाव करण्यापासून तो स्वत:ला रोखू शकला नाही.
काय म्हणाला अनुराग कश्यप?
शाहरूख याआधी एवढा सुंदर कधी वाटला नाही. आम्ही त्याला पहायला आलो होतो, आमचं मन खुश झालंय. सिनेमा मध्ये शाहरूखचा खतरनाक रोल आहे. मला नाही वाटत, त्याने याआधी असा कधी रोल केलाय. सिनेमामध्ये जॉन आणि शाहरूखची अॅक्शन खूप खतरनाक आहे. ज्याप्रकारे शाहरूख फिल्म करतो, त्यापैक्षा हा सिनेमा हटके आहे. सिनेमात काय बॉडी बनवलीये. ही बॉडी असली आहे का?, असा प्रश्न पडलाय, असंही अनुराग कश्यप (Anurag Kashyap) म्हणाला आहे.
दरम्यान, मला आठवत नाही की मी चित्रपटांमध्ये इतका मजेदार वेळ कधी गेला. हा सिनेमा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर (Pathaan blockbuster) ठरणार आहे, असं करण जोहर (Karan Johar) म्हणालाय. काही चाहत्यांनी सिनेमा डोक्यावर घेतलं असलं तरी काहींनी सिनेमा रटाळ असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता सिनेमागृहात प्रेक्षकांनी गर्दी होते की नाही?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.