मुंबई : हॉलिवूड कलाकार चर्चेत येण्यास अगदी लहानसं कारणंही पुरेसं असतं. सोशल मीडियावर ही मंडळी सर्रासपणे त्यांचे बोल्ड फोटो पोस्ट करत असतात. एका मर्यादेपर्यंत बोल्ड फोटोंचं हे प्रकरण नेटकऱ्यांनाही पटतं. पण, जिथं मर्यादा ओलांडली जाते, तिथं मात्र अडचणी निर्माण होताना दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या असं काही घडत आहे एका अतिशय लोकप्रिय गायिकेसोबत. मडोना या गायिकेनं इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो पोस्ट केले होते.


फोटो इतके बोल्ड होते की ते इन्स्टाग्रामच्याच वतीनं हटवण्यात आले. मडोनाचटे फोटो सोशल मीडियावर इतके व्हायरल झाले की पाहता पाहता अनेकांच्या भुवया उंचावल्या. 


फोटोंमधील बोल्डपणा पाहून त्यांना सेन्सॉरशिपच्या अटीअंतर्गत इन्स्टाग्रामनं डिलीट केलं. 


मडोनाला हे काही पटलं नाही, ज्यानंतर तिनं काही बदलांसह हे फोटो पुन्हा पोस्ट केले. पण, तरीही फोटो भुवया उंचावणारेच आहेत. 


63 वर्षीय मडोना या फोटोमध्ये फिशनेट पँटी, कट आऊट ब्रा आणि हाय हिल्स फ्लाँट करताना दिसत आहे.


फोटो पाहिल्यानंतर यामध्ये तिच्या स्तनाचा काही भाग दिसत असल्याचं स्पष्ट होत आहे. 



इन्स्टाग्रामकडून फोटो हटवण्यात आल्यानंतर यावर काहीशी नाराजीची आणि उपरोधिक प्रतिक्रिया देत महिला स्तनाशिवाय शरीराचा कोणताही भाग दाखवू शकतात अशी प्रतिक्रिया दिली होती.