मुंबई: आईच्या उदराएवढंच झाडांसोबत सुरक्षित वाटतं असं म्हणत वृक्षांवर जीवापाड प्रेम करणारे अभिनेते सयाजी शिंदे. मराठी लीडर या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचा सिनेमापलिकडचा खास प्रवास नव्यानं उलगडला आहे. झी 24 तासचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी मराठी लीडर या कार्यक्रमात सयाजी शिंदे यांच्यासोबत संवाद साधला. त्यावेळी सयाजी यांनी वॉचमन ते खलनायक आणि अभिनेता ते वृक्षसंवर्धन करणाऱ्या रिअल हिरोचा प्रवास उलगडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'म्हणून मला वॉचमनची नोकरी करावी लागली'
धरणात आमची जमीन गेली. त्यामध्ये खूप त्रास सहन करावा लागला. आम्हाला अन्नपाणी काही नाही. धरणग्रस्तांवर इतके अन्याय आहेत. कॉलेजला असताना मी डीएड झालो. त्यानंतर मला इरिगेशन डिपार्टमेंटला वॉचमनची नोकरी मिळाली. ती 29 दिवसांची ऑर्डर होती. दर महिन्याला ती ऑर्डर बदलायची. त्यावेळी 165 रुपये पगार मिळायचा.



त्यावेळी हा पगार खूप वाटायचा. तेव्हा जसा होते तसा आजही आहे. माझ्यासाठी छोटा मोठा असं नाहीय. अन्न आणि ऑक्सिजन सर्वांनाच सारखा लागतो. बाकी तुमच्या मनाचा खेळ आहे. तुमचं मन चांगलं तुमचं जग चांगलं. तुम्हाला दिशा कळणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही स्टेपबाय स्टेप चाललं पाहिजे असा मोलाचा कानमंत्रही सयाजी शिंदे यांनी तरुणांना दिला आहे. 


मी वॉचमनची नोकरी केल्यानंतर मी इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये क्लार्कची नोकरी मिळाली. मला तलाठी आणि इतर ठिकाणहून देखील नोकरीसाठी विचारलं जात होतं. मी कॉलेजमध्ये एकदा ठरवलं होतं की मला नट व्हायचं आहे. त्यानंतर निळूभाऊंशी भेट झाली. तिथे मी त्यांच्यासोबत संवाद साधला. 


8वीमध्ये असताना मला पहिलं स्त्री पात्र मिळालं. त्यानंतर झुलवाचं काम करताना मला स्त्री पात्र मिळालं. सलग हा प्रयोग केल्यानं ते आवडले आणि तशी कामंही मिळत गेली. ती पात्र लोकांचं मन जिंकत गेली. 


15 ऑगस्टसाठी वृक्षसंवर्धनासाठी खास संकल्प


एक गाव एक सरपंच आणि 100 झाडं ही खास संकल्पना 15 ऑगस्टला साकारणार आहोत. एकाच दिवसांत झाडांचं शतक करण्याचा उपक्रम 15 ऑगस्टला राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचं झाडं लावून त्यांचं संवर्धन करण्याचं आवाहन सह्याद्री देवराई आणि सरपंच परिषद मुंबई यांच्यावतीनं सयाजी शिंदे यांनी आवाहन केलं.