मुंबई : केरळच्या अंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव (IFFK) 26व्या आवृत्तीमध्ये अभिनेत्री भावना मेनन गेस्ट म्हणून दिसली. अभिनेत्रीने IFFK च्या मंचावर पाऊल ठेवताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचं स्वागत केलं. भावना मेननला केरळ राज्य चालचित्र अकादमीचे अध्यक्ष चित्रपट निर्माते रंजीत यांनी मंचावर आमंत्रित केलं. रंजीतने अभिनेत्रीला "शक्तीचे प्रतीक" म्हणून प्रेक्षकांसमोर आणलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भावनाने केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं दीपप्रज्वलन करून उद्घाटन केलं. प्रेक्षक उभे राहून अभिनेत्रीचं  स्वागत करत होते.  केवळ IFFK चे प्रेक्षकच नाही तर ट्विटरवरही भावनावर कौतुकाचा वर्षाव होत होता. ट्विटर यूजर्सनेही IFFK च्या मंचावर एक्ट्रेसला  ''एक मजबूत विधान'' या दृष्टिकोनातून पाहिलं.


भावना 5 वर्षानंतर  रोमांटिक ड्रामासोबत इंडस्ट्रित एन्ट्री घेत आहे.
भावना एका रोमँटिक ड्रामाद्वारे 5 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे. ती याआधी कन्नड चित्रपट 'भजरंगी 2' मध्ये दिसली होती. गेल्या आठवड्यात अभिनेत्री भावनाने सोशल मीडियावर तिच्या “विक्टिम होण्यापासून ते सर्वाइवर बनण्यापर्यंतच्या” प्रवासाबद्दल एक भावनिक नोट लिहिली. तिने लिहिलं की अनेक आवाज माझ्यासाठी पुढे येतात. मला माहित आहे की, न्यायाच्या या लढ्यात मी एकटी नाही.


साउथचे प्रसिद्ध अभिनेते दिलीपवर अभिनेत्रीने लावले गंभीर आरोप
अभिनेत्रीने 2017 मध्ये साऊथमधील प्रसिद्ध अभिनेता दिलीपवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप लावले होते. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भावना म्हणाली होती की, ''मी माझा सन्मान परत मिळवण्यासाठी लढेन. आत्तापर्यंत मी स्वतःला जबाबदार धरत होते. मी जेव्हा-जेव्हा या घटनेचा आणि त्यानंतर काय घडलं याचा विचार करते तेव्हा-तेव्हा माझा जीव गुदमरतो. जणू काही माझ्या बाबतीत घडलेल्या प्रकारात चूक माझीच आहे. मी पूर्णपणे तुटले होते. पण मी माझा आत्मविश्वास गमावलेला नाही. 2020 मध्ये मी 15 वेळा कोर्ट रूममध्ये गेले होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वकिलांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. प्रत्येक वेळी मला स्वतःला निर्दोष सिद्ध करावं लागलं.''



किडनॅप करुन भावनावर लैंगिक छळ केला 
ही घटना 17 फेब्रुवारी 2017 रोजी घडल्याचं भावनाने मुलाखतीत सांगितलं होतं. शूटिंगनंतर घरी जाण्यासाठी ती कारमध्ये बसली तेव्हा काही लोकांनी तिला किडनॅप केलं. सुमारे 2 तास 4 जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला. काही आरोपींनी अभिनेत्रीला ब्लॅकमेल करण्यासाठी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही बनवला. अभिनेत्रीने कसा तरी आपला जीव वाचवला. या प्रकरणात 10 पैकी 7 आरोपींना केरळ पोलिसांनी अटक केली होती. त्यांना पुराव्याअभावी सोडून देण्यात आलं होतं. कट रचल्याचा आरोप असलेल्या अभिनेता दिलीपलाही जामीन मिळाला.