`विचारून सांगतो..` सुष्मिता सेन अडकणार विवाहबंधनात?
अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल काही ना काही कारणाने चर्चेत असतात.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल काही ना काही कारणाने चर्चेत असतात. आता मात्र दोघेही एका खास कारणासाठी चर्चेचा विषय ठरत आहेत. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारी सुष्मिता बॉलिवूडपासून दूर असली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या काही कमी झालेली नाही. नुकताच तिच्या एका चाहत्याने तिना बॉयफ्रेंड रोहमनसोबत विवाह कधी करणार असा प्रश्न विचारला. सोशल मीडियावर रंगलेल्या लाईव्ह चॅट दरम्यान या प्रश्नाचे उत्तर देताना दोघांनी देखील त्यांच्या चपळ बुद्धीचा चांगलाच उपयोग केला.
चाहत्याच्या प्रश्नावर ती म्हणाली रोहमनला विचारा लग्न कधी करणार. यावर रोहमन 'विचारून सांगतो..' असं म्हणत दोघांनी प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. सुष्मिता कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
सुष्मिता मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी तिची मुलगी रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान , रिनी २१ वर्षांची असून ती 'सुट्टाबाजी' नावाच्या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सोशल मीडियावर व्हायर होत असलेल्या फोटोंच्या माध्यमातून रिनी शुटिंगमध्ये व्यस्त असल्याचं दिसून येत आहे.
या चित्रपटात कोमल छाबडिया आणि राहुल वोहरा रिनीच्या आई-वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर रिनीच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक कबीर खुराना यांच्या खांद्यावर आहे. महत्त्वाचं 'सुट्टाबाजी' चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित न होता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.